-
शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची हिंगोलीत सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार संतोष बांगर यांच्यावर टीका केली.
-
“आताही काही गद्दार बेंडकुळ्या दाखवत आहेत. पण, त्या बेंडकुळ्यांमध्ये हवा आहे. जनतेची ताकद माझ्याकडे आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
-
“गद्दाराला नाग समजून पूजा केली. मात्र, हा नाग उलटा फिरून डसायला लागला. साप पायाखाली आल्यावर काय करायचं तुम्हाला कळतं. पुंगी वाजवली, दूध पाजलं, सगळं वाया गेलं,” असं टीकास्र उद्धव ठाकरे यांनी संतोष बांगर यांच्यावर सोडलं.
-
“सरकार आपल्या दारी आणि थापा मारतंय लई भारी. अतिवृष्टीची मदत अजून शेतकऱ्याला मिळालेली नाही,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
-
“भाजपात सगळ्या पक्षातून आयाराम दाखल होत आहेत. त्यामुळे भाजपाच्या निष्ठावतांची दया येते,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
-
“डबल इंजिन सरकार होतं, आता अजित पवारांचा डबा लागला आहे. नंतर तुमची मालगाडी होईल,” असा टोला शिंदे-फडणवीस सरकारला उद्धव ठाकरेंनी लगावला.
-
“भाजपामध्ये तुम्हाला नेते घडवता येत नाही का? तुमच्या पक्षात नेते नाहीत का? तुम्हाला नेते आणि वडील माझे लागतात. त्या दिल्लीच्या वडिलांची हिंमत राहिली नाही का? हे ना***** आहेत. त्यांना स्वत:चे काही विचार नाही. भाजपा फक्त कार्यकर्त्यांना वापरून घेते,” असं टीकास्र उद्धव ठाकरे यांनी सोडलं.
-
“आपल्या दाडीवाल्याने भाजपाची पावडर लावली. भाजपात प्रवेश केला की शुद्ध होतो”, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला.
-
“मागे देवेंद्र फडणवीसांना मी कलंक बोललो होतो. त्यांना फडतूस म्हणाले, तर बोबाटा झाला होता. आता मी त्यांना थापाड्या म्हणणार होता. पण, त्यांना थापाड्या म्हणत नाही. अरे टरबूजालाही पाणी द्यावं लागतं,” अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर केली.

अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात