-
“शरद पवार आगे बढो…” ही घोषणा ८४ व्या वर्षात पदार्पण करत असताना आजही शरद पवार यांचे कार्यकर्ते, समर्थक देतात. याच्यातूनच शरद पवार यांचे या वयातील महत्त्व दिसून येते. सोळावा फोटो आहे खास. राष्ट्रवादीच्या पहिल्या अधिवेशनाच्या फोटोत दिसणारे नेते आता शरद पवारांसोबत आहेत?
-
१९६२ सालापासून शरद पवार सामाजिक जीवनात आहेत. १९६७ साली ते अवघ्या २७ व्या वर्षी आमदार झाले. तिथून सुरू झालेला जाहीर सभांचा झंझावात आजही सुरू आहे. ८३ वा वाढदिवस नागपूर येथे जाहीर सभा घेऊन साजरा केला जाणार आहे.
-
आंदोलन हा राजकारणाचा आत्मा आहे. माथाडी कामगारांच्या मागण्यांसाठी आंदोलन करताना शरद पवार.
-
भूकंप असो, दुष्काळ, अवकाळी संकट असो.. अडचण कोणतीही असो तिथे सर्वात आधी पोहचण्याचा शिरस्ता शरद पवार जपतात. जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीमार झाल्यावर सरकारच्याआधी ते पोहोचले होते.
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात नियमित येत नसल्याबाबतचा उल्लेख शरद पवार यांनी आत्मचरित्रात केला आहे. त्याआधी ते स्वतः मुख्यमंत्री असताना नियमित मंत्रालयात येऊन कामकाज करत असत.
-
शरद पवार यांनी पुलोदचे सरकार स्थापन केल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना काँग्रेसमध्ये येऊन संजय गांधी यांच्यासह काम करण्याचा प्रस्ताव दिला होता. ३८ वय असलेल्या शरद पवार यांनी या प्रस्तावास साफ नकार दिला आणि त्यानंतर पुलोदचे सरकार पडले.
-
पुढे राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्याशीही शरद पवार यांचे चांगले संबंध होते.
-
शरद पवार अगदी तरूण वयात असताना त्यांचा परिचय स्व. यशवंतराव चव्हाण यांच्याशी आला. चव्हाण यांच्या पाऊलवाटेवर शरद पवार आजही मार्गक्रमण करत आहेत.
-
राजकारण, समाजकारण करत असताना प्रशासनावर उत्तम पकड, अधिकाऱ्यांसह सौहार्दाचे संबंध ही शरद पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणखी एक जमेची बाजू आहे.
-
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तेजस लढाऊ विमानातील उड्डाणाचे फोटो समोर आले होते. शरद पवार देशाचे संरक्षण मंत्री असताना त्यांनीही लष्कराच्या सामग्रीची जवळून तपासणी केली होती. हवाई दलाची पाहणी करताना शरद पवार.
-
शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त देशातील सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख नेते एकाच मंचावर आलेले पाहायला मिळाले. भारतीय राजकारणात क्वचितच असा क्षण पाहायला मिळाला असेल.
-
कर्करोगातून यशस्वीपणे बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांनी राजकारणासह सर्वच क्षेत्रात सक्रियता दाखविली. गोल्फ खेळतानाचा त्यांचा एक फोटो.
-
२००३ साली शरद पवार यांना भारतीय संघाला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा चषक देता आला नाही. मात्र २०११ साली त्यांच्याच हस्ते भारतीय संघाला चषक देतानाचा योगायोग घडून आला.
-
महाराष्ट्रासह इतर राज्यातही शरद पवार यांनी राष्ट्रवादीचा प्रसार केला. केरळ राज्यात पक्षाचे काही आमदार आहेत. केरळच्या दौऱ्यावर गेले असताना त्यांनी पारंपरिक वेष परिधान करून कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण केली.
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह त्यांचा फोटो नाही, अशी टीका राज ठाकरेंनी केली होती. हा फोटो स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समारंभातला आहे. जेथे त्यांनी छत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन केले होते.
-
हा फोटो आजच्या प्रासंगिक राजकारणात सर्वात महत्त्वाचा आहे. राष्ट्रवादीचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन. आज २३ वर्षांनी पहिल्या अधिवेशनात उपस्थित असलेले अनेक नेते त्यांच्यासह नाहीत. तरीही शरद पवार त्याच ताकदीने ठामपणे उभे आहेत.

नुसता पैसा! शनी-सूर्याचा अर्धकेंद्र योग देणार पैसा, प्रेम अन् प्रत्येक क्षेत्रात यश