-
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींवर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे.
-
काल (१२ ऑक्टोबर) दसऱ्याच्या दिवशी ही घटना घडली आहे.
-
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे.
-
दरम्यान, बाबा सिद्दीकी हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध नेते होते. त्यांनी १९९९, २००४ आणि २००९ मध्ये सलग तीन वेळा आमदारकीची निवडणूक जिंकली होती. त्यांची राजकीय सुरुवात एक विद्यार्थी नेता म्हणून झाली होती. पहिल्यांदा ते बीएमसीमध्ये नगरसेवक निवडून आले होते.
-
बाबा सिद्दीकी वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करीत होते. २००४ ते २००८ दरम्यान ते महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा आणि कामगार राज्यमंत्री होते. ते हा संबंध काळ काँग्रेस पक्षाचे सक्रिय पुढारी होते.
-
आयुष्याचे तब्बल ४८ वर्षे काँग्रेस पक्षाला दिल्यानंतर त्यांनी २०२४ च्या फेब्रुवारीमध्ये पक्षाचा राजीनामा दिला होता.
-
त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला, दरम्यान त्यांनी कॉँग्रेस सोडताना एक पोस्ट त्यांच्या ट्विटरवर शेअर केली होती.
-
या पोस्टमध्ये ते म्हणाले होते “मी तरुण असताना काँग्रेस पक्षात सामील झालो आणि ४८ वर्षांचा हा एक महत्त्वाचा प्रवास केला. आज मी काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला व्यक्त व्हायला खूप आवडेल, परंतू काही गोष्टी उघड न झालेल्या ठीक असेल. या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो.”
-
दरम्यान त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील विभाजनानंतर अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला होता.

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”