-    मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 
-    माहीम मतदारसंघातून त्यांना मनसेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. 
-    मनसेने पहिल्याच यादीमध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचे नाव जाहीर केले होते. 
-    दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करताना राज ठाकरे देखील उपस्थित होते. 
-    याशिवाय अमित यांच्या पत्नी आणि परिवारातील इतर सदस्यदेखील आवर्जून उपस्थिती होते. 
-    माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीने पाठिंबा दिला असल्याच्या चर्चा सुरू आहेत. 
-    असं असलं तरी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर हे मात्र येथून लढणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 
-    दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने महेश सावंत यांना येथून उमेदवारी दिली आहे. 
-    (सर्व फोटो साभार – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस) 
 हेही पाहा –Baramati : बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, युगेंद्र…
 
  Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
  