-
कुणाल कामरावरील गुन्हे मागे घेण्याच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात काल (१६ एप्रिल) सुनावणी झाली.
-
“कुणाल कामराचे तुकडे करण्याची धमकी देण्यात आली आहे”, असा युक्तिवाद कुणाल कामराच्या वकिलांनी केला आहे.
-
या सुनावणी दरम्यान कुणाल कामरा याच्या वकिलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ते महायुतीत येण्यापूर्वी केलेल्या विधानांचाही दाखला दिला.
-
कामराचे वकील म्हणाले “गद्दारांना धडा शिकवला पाहिजे असे अजित पवार म्हटले होते. त्यावेळी त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. त्यांची कोणी तक्रार केली नाही.”
-
“याचबरोबर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उद्धव ठाकरे यांनीही शिंदे आणि त्यांच्याबरोर गेलेल्या आमदारांना गद्दार म्हटले होते”, असे कुणाल कामराचे वकील म्हणाले
-
कोर्ट काय म्हणाले?
यात कुणाल कामराच्या जीवाला जर धोका असेल तर त्याला मुंबईत जबाब नोंदवायला का बोलवता? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने पोलीसांना केली. -
तसेच जबाब नोंदवण्यासाठी कुणाल कामराच्या अटकेची गरज नाही.
-
तामिळनाडूमध्ये कुणाल जबाब नोंदवू शकतो, असे न्यायालयाने म्हटले आहे.
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक गाणे बनवल्याने कुणालवर गुन्हा दाखल आहे. (सर्व फोटो- लोकसत्ता संग्रहित)

‘एक नंबर तुझी कंबर…’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही करतायत कौतुक