-
उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यातून एक प्रकरण समोर आले आहे, ज्याने सर्वांनाच धक्का बसला. एका सासूने मुलीच्या लग्नाच्या काही दिवस आधी होणार्या जावयासह पळ काढला. या संपूर्ण प्रकरणामुळे समाज आणि नातेसंबंधांबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. (Photo Source: India Rail Info)
-
प्रेमकहाणी कशी सुरू झाली?
हे प्रकरण मडराक पोलीस ठाणे परिसरातील मनोहरपूर गावातील आहे. जितेंद्र नावाच्या व्यक्तीने आपल्या मुलीचे लग्न शेजारच्या गावातील रहिवासी राहुलशी ठरवले होते. लग्नाची तारीख १६ एप्रिल निश्चित झाल आणि लग्नाची तयारी जोरात सुरू होती. (Photo Source: Social Media) -
दरम्यान, राहुल आणि त्याची होणारी सासू सपना यांच्यात जवळीक वाढू लागते. राहुलने होणाऱ्या सासू सपना यांना मोबाईल भेट दिला होता आणि त्यातून दोघांमध्ये संभाषण सुरू झाले, जे हळूहळू प्रेमप्रकरणात रूपांतरित झाले. (Photo Source: Social Media)
-
६ एप्रिल रोजी दोघेही फरार
लग्नाला फक्त दहा दिवस उरले असताना ६ एप्रिल रोजी सपना आणि राहुल घरातून पळाले. तिने तिच्या मुलीच्या लग्नासाठी गोळा केलेले दागिने आणि रोख रक्कमही पळवून नेली. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. पती जितेंद्रने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि आरोप केला की, त्याची पत्नी घरातून दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेली आहे. (Photo Source: Social Media) -
गुरुवारी (१७ एप्रिल) पोलीस ठाण्यात दोन्ही पक्ष आमनेसामने आले. सपनाचा सात वर्षांचा मुलगा त्याच्या आईला मिठी मारत रडू लागला, पण सपनाने तिच्या मुलाच्या डोळ्यातील अश्रूंकडे दुर्लक्ष केले आणि राहुलचा हात धरून बसली. मुलगी मात्र तिथे गेली नाही, ती म्हणाली, माझी आई आता तिच्यासाठी मेली आहे. तिने स्पष्टपणे सांगितले की, तिला आता तिच्या आईबरोबर कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत. (Photo Source: Social Media)
-
पतीने माफी मागितली, पण..
पती जितेंद्र म्हणाला की, मी सपनाला माफ करेल. पण तिनं घरातून पळविलेले दागिने आणि रोख रक्कम परत करावी. अशी अट जितेंद्रने घातली. तो म्हणतो की त्याने त्याच्या मुलीच्या लग्नासाठी खूप मेहनत घेऊन हे दागिने आणि पैसे गोळा केले होते. (Photo Source: ANI) -
राहुलच्या वडिलांनीही स्पष्टपणे सांगितले की, त्यांचा मुलगा आता त्यांच्यासाठी मेला आहे. त्याने आरोप केला की, सपनाने त्याच्या मुलावर जादू केली आहे. सपनाने त्यांच्या मुलाला ताबीज बांधले होते, ज्यामुळे त्याचे वर्तन पूर्णपणे बदलले. आता त्यांनी मुलाला कुटुंबाच्या संपत्तीमधूनही बेदखल केले आहे. (Photo Source: ANI)
-
या प्रकरणात पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली. ६ एप्रिल रोजी दोघे प्रथम कासगंज आणि नंतर उत्तराखंडमधील रुद्रपूरला पळून गेले होते, तेथून ते बुधवारी परतले. आता पोलिस दोघांचेही समुपदेशन करत आहेत. कारण दोघेही प्रौढ आहेत आणि कायदेशीररित्या त्यांच्या इच्छेनुसार कुठेही राहू शकतात. (Photo Source: ANI)
-
या अजब प्रेमकथेने समाजात खळबळ उडाली आहे. नातेसंबंधांच्या या नवीन स्वरूपाबद्दल लोकांना आश्चर्य वाटते. मुलीचा होणारा नवरा आता तिच्या आईचा प्रियकर बनला आहे आणि मुलीने तिच्या आईशी असलेले सर्व संबंध तोडले आहेत. हे प्रकरण सामाजिक आणि पारंपारिक मूल्यां आव्हान देणारे आहे, असे काहींचे म्हणणे आहे. (Photo Source: Social Media)

Mayuri Hagawane: “वैष्णवी गर्भवती असताना तिला…”, हगवणे कुटुंबाच्या छळाचा मोठ्या सुनेनं वाचला पाढा