-
Raj Thackeray Uddhav Thackeray Rally Updates: आज (Shivsena) शिवसेना (ठाकरे) व महाराष्ट्र नवनिर्माम सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) वतीने विजयी मेळाव्याचे आयोजन वरळीतील (मुंबई) एनएससीआय डोम येथे करण्यात आले होते.
-
राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की, आम्हा दोघा भावांना एकत्र आणणं बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं, असं म्हणत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची जोरदार सुरुवात केली.
-
हिंदी सक्तीबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले कुणालाही न विचारता हिंदी सक्ती कशासाठी? तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून का? तुमची सत्ता विधानभवनात. इथं रस्त्यावर आमची सत्ता आहे, असे राज ठाकरे यांनी सुनावलं.
-
हिंदीची सक्ती कशाला करता? असे विचारताना राज ठाकरे म्हणाले की, हिंदी बोलणारे राज्य मागास आहेत आणि हिंदी न बोलणारे राज्य प्रगत आहेत. मग आम्ही हिंदी शिकून असा काय विकास होणार आहे?
-
मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासाठी आधी भाषेला हात घातला. यांनी चाचपडून पाहिले. पण विरोध झाल्यानंतर मागे हटले. परत मराठी भाषेला हात लावून दाखवा असे आव्हान राज ठाकरे यांनी दिले.
-
आमची मुलं इंग्रजी शाळेत शिकत आहेत, असा युक्तिवाद सत्ताधारी करत आहेत. त्यांच्या या दाव्याला काही अर्थ नाही.
-
बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे इंग्रजी शाळेत शिकले, पण त्यांच्या मराठी अभिमानाद्दल कुणाला संशय आहे का? तसेच लालकृष्ण आडवाणी मिशनरी हायस्कूलमध्ये शिकले. त्यांच्या हिंदुत्वाबद्दल कुणाला शंका आहे का? असे राज ठाकरे यांनी म्हटले.
-
मराठी म्हणून तुम्ही लोक एकत्र आल्यानंतर तुम्हाला जातीमध्ये विभागले जाईल, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
-
मीरा रोड येथे मारहाण झाली, तो गुजराती होता, हे कुणालाही माहीत नव्हतं. बाचाबाचीत एका व्यक्तीला मारलं, तो गुजराती होता म्हणून मारलेलं नाही. अजून आम्ही काहीच केलेले नाही.
-
जो चूक करेल, त्याला कानाखाली वाजवाच. पण उठसूठ कुणालाही मारण्याची गरज नाही. जर कुणाला मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका, असेही आवाहन राज ठाकरे यांनी केले.
-
पुढे काय होईल, ते होईल. मराठीसाठी झालेली ही एकजूट अशीच राहावी, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

“जे बाळासाहेबांसह कोणालाच जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं”, राज ठाकरेंचं वक्तव्य