-
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दोन दिवस मुलाखत दिली. (Photo: Shivsena UBT)
-
याच पक्षाचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पहलगाम हल्ला, भाजपा, मनसेशी युती, महाराष्ट्रातील सद्य स्थिती या आणि अशा मुद्द्यांवर आपलं मत मांडलं आहे. (Photo: Shivsena UBT)
-
नरेंद्र मोदी
लोकसभेच्या निवडणुका होऊन एक वर्ष झालं. लोकसभेच्या निवडणुकीत मोदींना बहुमत मिळालं नाही. मोदींनी लोकसभेला बहुमत गमावणं तुम्ही याकडे कसं पाहता? या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “तुम्ही कदाचित सर्व जणांना एकदा मुर्ख बनवू शकता. पण सर्वांना सर्वकाळ मुर्ख बनवू शकत नाहीत. मला असं वाटतं की यामध्ये सर्वच आलं. आता हळू-हळू लोक यामधून बाहेर पडायला लागले आहेत. तुम्ही १० वर्षांपूर्वी जे काही सांगितलं होतं की आम्ही एवढ्या नोकऱ्या देऊ? त्या कुठे आहेत? देशासाठी १० वर्ष खूप झाले. (File Photo) -
देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा होते का? असं विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले, “नाही, चर्चा फार होत नाहीत. सुरुवातीला जाऊन मी त्यांना गुच्छ दिला होता. आहेत ते मुख्यमंत्री, मानो या मानो. तुमच्याकडून चांगलं व्हावं अशी माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. उलट आत्ता जे काही त्यांच्या सहकारी मंत्र्याच्या भानगडी, लफडी, कुलंगडी बाहेर येत आहेत ती त्यांनी मोडीत काढावीत. आमचे कधीकाळीचे राजकीय मित्र म्हणून सांगतो आहे, हे माझं मत आणि सल्ला आहे टोमणा नाही. जर देवेंद्र फडणवीस हे नीती वगैरे सगळ्या गोष्टी मानत असतील तर त्यांच्या प्रतिमेला तडा देणारं हे काम आहे, कुठे जमिनी लाटल्या जात आहेत, कुठे धक्काबुक्की होते आहे, कुठे तीन हजार कोटींची चोरी सुप्रीम कोर्ट पकडून देतं आहे, या सगळ्याचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस बदनाम होत आहेत. त्यांच्या अधिपत्याखाली भ्रष्टाचार म्हणजे दिव्याखाली अंधार तसा हा प्रकार आहे.” (File Photo) -
एकनाथ शिंदेंना उत्तर
“त्यांची अर्धी दाढी तरी राहिलीय हेच नशीब समजावं. त्यांनी जास्त बोलू नये. नाहीतर लोक त्यांची बिनपाण्याने करतील. अर्धी राहिलीय ती देखील काढतील. ती दाढी महाराष्ट्रातील प्रश्न का सोडवत नाही?” (File Photo) -
राज ठाकरे
(युतीसाठी) तुमची राज ठाकरेंशी चर्चा झाली आहे का? त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “होईल. पहिलं आम्ही २० वर्षांनी एकत्र तर आलो आहोत, हीच मोठी गोष्ट आहे. त्यामुळे माझ्या भाषणात म्हटलं की आज आमच्या भाषणा पेक्षा एकत्र दिसण्याला फार महत्व आहे”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. (File Photo) -
भाजपावर टीका
“मला वाटतं की महाराष्ट्र विरुद्ध इतर राज्य असा संघर्ष पेटला नाही. पण अशा प्रकारचा संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. मात्र, हा संघर्ष पेटत नाही. याचं कारण आमची भूमिका स्पष्ट आहे. कारण आम्ही कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाहीत. आम्ही महाराष्ट्रामध्ये मराठी आहोत, पण देशाचा विचार केला तर आम्ही हिंदू आहोत. जेव्हा देशाचा विचार करतो तेव्हा आपण हिंदू म्हणून एकत्र असतो”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. (File Photo) -
हिंदी भाषेला विरोध?
“शिवसेनेचा हिंदी भाषेला विरोध नाही. माझे आजोबा देखील सांगायचे की तुम्हाला जेवढ्या भाषा शिकायच्या तेवढ्या शिका. पण तुम्ही जबरदस्ती करू नका. आज तुम्ही (संजय राऊत) राज्यसभेत हिंदीत बोलता. मी देखील अनेक वेळा माध्यमांसमोर हिंदीत बोलतो. त्यामुळे आमचा हिंदीला विरोध किंवा हिंदी भाषेचा आम्हाला द्वेष नाही. पण हिंदींची सक्ती नको. आमचा हनुमान चालीसाला विरोध नाही. पण तुम्ही आम्हाला मारुती स्तोत्र का विसरायला लावता? आम्ही मारुती स्तोत्र म्हणतो तुम्ही हनुमान चालिसा म्हणा”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. (File Photo) -
नरेंद्र मोदी यांना पंचहात्तरीची शाल मोहन भागवत घातली आहे-उद्धव ठाकरे
नरेंद्र मोदींना पंचाहत्तरीची शाल मोहन भागवत यांनी घातलेली आहे. आता बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पावले आहेत ते कळेल आता. मोहन भागवतही निवृत्त होण्याच्या विचारात आहेत अशावेळी मोदी शब्द पाळतील का? असं विचारलं असता उद्धव ठाकरेंनी यावर उत्तर दिलं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं म्हणतात, आता यांची पावलं वाकडी पडतात का? ते कळेल असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. (File Photo) -
विधानसभेत काय झालं?
‘लोकसभेवेळी महाविकास आघाडीत अनेक पक्ष आल्यावर खेचाखेच होते. शिवसेना-भाजपामध्येही होत होती. महाविकास आघाडी म्हणून पहिल्यांदा लोकसभा लढलो. शिवसेनेने चार ते पाचवेळा जिंकलेले मतदारसंघ आपल्याला जिंकायचंय म्हणून सोडून दिले. विधानसभेला हा मतदारसंघ तुला, हा मला हे शेवटच्या दिवसापर्यंत सुरूच राहिलं. तू तू मैं मैं सुरू राहिलं. दुष्परिणाम असा झाला की जनतेत असं झालं की यांच्यात आताच खेचाखेच सुरू असेल तर नंतर काय होणार’. (File Photo) हेही पाहा- अमृता फडणवीस यांचं माहेरचं आडनाव काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल