-
५ जुलै ते २३ ऑक्टोबर या कालावधीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकूण ९ भेटीगाठी झाल्या आहेत. आपण जाणून घेऊ या भेटींबाबत. (सर्व फोटो सौजन्य-सोशल मीडिया पेज, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे )
-
५ जुलै २०२५ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या विजयी मेळाव्यात एकत्र आले. दोघांचीही भाषणं झाली. एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
-
२७ जुलै २०२५ : उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने राज ठाकरेंनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
-
२७ ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे गणपती दर्शनसाठी राज ठाकरेंच्या घरी सहकुटुंब भेटले. ज्यावेळी ठाकरे कुटुंबाचा स्नेहभोजन कार्यक्रम हा राज ठाकरेंच्या घरी म्हणजेच शिवतीर्थ या ठिकाणी पार पडला.
-
उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी १९ ते २० वर्षांनी आले. त्यामुळे ही भेटही महत्त्वाची ठरली.
-
१० सप्टेंबर : उद्धव ठाकरे हे अनिल देसाई आणि संजय राऊत यांच्यासह राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेले होते. तिथे आपण मावशीशी चर्चा करायला गेलो असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
-
५ ऑक्टोबर : संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. त्यानंतर राज ठाकरे मातोश्रीवर पोहचले आणि त्यापाठोपाठ उद्धव ठाकरेही पोहचले दोघांमध्ये राजकीय चर्चा झाल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.
-
१२ ऑक्टोबर : राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवसास्थानी त्यांच्या मातोश्रींसह आणि संपूर्ण कुटुंबासह पोहचले. ठाकरे कुटुंबांमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला.
-
१७ ऑक्टोबर : राज ठाकरेंच्या मनसेच्या दीपोत्सवाला उद्धव ठाकरे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती. ठाकरे कुटुंबियांचं फोटो सेशन
-
२२ ऑक्टोबर : उद्धव ठाकरे पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी आले होते.
-
२३ ऑक्टोबर राज ठाकरेंची बहीण जयवंती यांच्या घरी भाऊबीजेच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते.

IND vs AUS: “अरे तू करून बघ, मला नको बोलू…”, श्रेयस अय्यर भर मैदानात रोहित शर्मावर वैतागला; नेमकं काय घडलं? VIDEO