-
बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान होण्याच्या एक दिवस आधी राहुल गांधी यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन हायड्रोजन बॉम्ब फोडल्याचा दावा केला. हरियाणा फाइल्स या नावाने त्यांनी काही कागदपत्रे सादर केली. ज्यात त्यांनी हरियाणा राज्यात बोगस मतदार असल्याचा दावा केला.
-
राहुल गांधी यांनी दावा केला की, हरियाणामध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी २५ लाखांहून अधिक बोगस मतदार तयार केले गेले होते. ज्यामुळे सर्व ओपिनियन पोलमध्ये आणि पोस्टल बॅलेटमध्ये काँग्रेस पुढे असूनही त्यांचा पराभव झाला.
-
एच-फाइल्स या नावाने त्यांनी काही कागदपत्रे सादर केली. लाखांहून अधिक बोगस मतदार तयार करून लोकशाहीवरील सर्वात मोठा हल्ला केला गेला असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.
-
राहुल गांधी म्हणाले की, हरियाणामध्ये २ कोटी मतदार आहेत. यापैकी २५ लाख बोगस मतदार आहेत. एका महिलेचा फोटो वापरून १०० जागांवर मतदान करण्यात आले. १२.५ टक्के मतदार बोगस होते. म्हणूनच काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला.
-
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत कथित ब्राझीलच्या मॉडेलचा फोटो दाखवला. हा फोटो वापरून वेगवेगळ्या नावांनी २२ वेळा मतदान केल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. या फोटोतील महिला ब्राझीलची मॉडेल असल्याचे त्यांनी सांगितले.
-
राहुल गांधींच्या आरोपानुसार, मतदार यादीत जाणूनबुजून गडबड करण्यात आली. जेणेकरून भाजपाला याचा फायदा होईल. आयोगाने जर ठरवले तर ते एका मिनिटात दुबार किंवा ब्लर फोटो हटवू शकतात. पण ते
असे करत नाहीत, कारण त्यांना भाजपाची मदत करायची आहे. -
राहुल गांधींच्या आरोपांना हरियाणाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी उत्तर दिले. ते म्हणाले, काँग्रेसकडे मतदारयादीची माहिती २०२४ लाच देण्यात आली होती. मात्र सप्टेंबर महिन्यापर्यंत त्यांच्याकडून एकाही व्यक्तीने तक्रार दाखल केली नाही.
-
निवडणूक आयोगाने सांगितले की, राज्यात २०,६३२ बीएलओ, ८६,७९० पोलिंग एजंट आणि १०,१८० काउंटिंग एजंट उपस्थित होते. मात्र कुणीही बोगस मतदानाची तक्रार दाखल केली नाही.
-
बिहारच्या निवडणुकीवर परिणाम होणार?
बिहारमध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान होण्याआधी राहुल गांधींनी हरियाणा फाइल्स उघडल्यामुळे त्याचा मतदानावर काही फरक पडणार का? अशी चर्चा आहे. राहुल गांधी यांनी याआधी बिहारमध्येही वोट चोरी यात्रा काढली होती. तिथे SIR चा मुद्दाही तापला होता.
दोन दोन दिवस पोट साफ होत नाही? रात्री फक्त ‘या’ पानांचं सेवन करा; सकाळी आतड्यांतील सगळी घाण होईल साफ