-
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतील बनारस रेल्वे स्थानकावरून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. ज्यामुळे भारताच्या विस्तारणाऱ्या सेमी-हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कला आणखी चालना मिळाली. (Source: Photo by ANI)
-
उद्घाटन समारंभ सुरू होताच पंतप्रधान मोदींंनी जमलेल्या गर्दीला हात उंचावून दाखवत अभिवादन केले. (Source: Photo by ANI)
-
आज सुरू झालेल्या चार नवीन वंदे भारत रेल्वे मार्गांमध्ये बनारस-खजुराहो, लखनऊ-सहारनपूर, फिरोजपूर-दिल्ली आणि एर्नाकुलम-बंगळुरू यांचा समावेश आहे. (Source: Photo by ANI)
-
आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधानांनी वंदे भारत गाड्यांचे वर्णन भारतीय रेल्वे आणि देशासाठी “परिवर्तनाचे प्रतीक” असे केले. (Source: Photo by ANI)
-
आजच्या कार्यक्रमाचे एक वैशिष्ट्य म्हणजे पंतप्रधान मोदींनी एका ट्रेनमध्ये शालेय मुलांच्या गटाशी संवाद साधला, त्यांचे अभिनंदन केले आणि म्हटले की, “माझ्या काशीमध्ये खूप प्रतिभावान मुले आहेत”. (Source: Photo by ANI)
-
मुलांशी झालेल्या संवादादरम्यान त्यांनी विविध स्पर्धा, कविता आणि विकासात्मक उपक्रमांवर चर्चा केली. भारताच्या प्रगतीच्या मार्गावर तरुणांच्या प्रतिभेलाही सहभागी करून घेण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता. (Source: Photo by ANI)
-
बनारस-खजुराहो मार्गावर सुरू झालेल्या नवीन सेवेमुळे पूर्वीच्या विशेष ट्रेनच्या तुलनेत प्रवासात आता सुमारे २ तास ४० मिनिटे बचत होण्याची अपेक्षा आहे. (Source: Photo by ANI)
-
वेगवान आणि अधिक आरामदायी प्रवास आणि पर्यटन, व्यापार आणि प्रादेशिक विकासासाठी कनेक्टिव्हिटीचा विस्तार करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. (Source: Photo by ANI)
-
युनेस्कोचे वारसा स्थळ आणि पर्यटनसाठी प्रसिद्ध असलेल्या खजुराहोला जोडणाऱ्या नवीन ट्रेन्समुळे हा कार्यक्रम उत्तर प्रदेश आणि शेजारील राज्यांसाठी एक महत्त्वाचा उपक्रम ठरला आहे. (Source: Photo by ANI)
प्रचंड पैसा, नवं घर, नोकरी…१५ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींचे नशीब खुलणार; बुध अस्त योगानं भरभराट होणार, पिढ्यानं पिढ्या होतील समृद्ध