-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रणबीर कपूर आणि विवेक ऑबरॉय यांना एका कार्यक्रमादरम्यान राखी बांधताना चिमुरड्या मुली. (छायाः प्रशांत नाडकर)
-
भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाला शनिवारी राष्ट्रपती भवनात झालेल्या शानदार कार्यक्रमात प्रतिष्ठेचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. (छायाः पीटीआय)

‘वेगाच्या दुनियेतील अनभिषिक्त सम्राट’ म्हणून ख्याती असलेल्या उसेन बोल्टने १०० आणि २०० मीटर धावण्याच्या शर्यतीमधील सोनेरी यशानंतर रिले शर्यतीत सांघिक सुवर्णपदक प्राप्त करून तिहेरी धमाका साजरा केला. बोल्टचे जागतिक स्पर्धेच्या कारकीर्दीतील हे ११वे सुवर्णपदक आहे. (छायाः पीटीआय) -
रक्षाबंधनाचा सण शनिवारी सर्वत्र साजरा होत असतानाच डोंबिवलीतील मिलाप नगर येथे नुकतीच जन्मलेली ही चिमुरडी बिल्डिंगच्या पाय-यांवर आढळली. ज्यादिवशी भाऊ आपल्या बहिणीला तिच्या रक्षणाचे वचन देतो त्याचदिवशी मात्र या चिमुरडीसाठी पाठीराखा कोण? असा प्रश्न उभा राहिला. त्यानंतर तिला बाल संगोपन केंद्रात नेण्यात आले. (छायाः दीपक जोशी)
जोहरान ममदांनी यांच्या विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “..म्हणून रिपब्लिकन उमेदवारांचा पराभव”