-
भाजपाचे दक्षिण बंगळुरूचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांच्याशी झालेल्या विमान प्रवासातील संभाषणाबाबत पोस्ट शेअर केली आहे. (Photo: Reuters)
-
तेजस्वी सूर्य यांनी याला, कृत्रिम बुद्धिमत्ता व उत्पादनापासून नेतृत्व आणि नीतिमत्तेपर्यंत सर्व गोष्टींवर “२ तासांचा मास्टरक्लास” संवाद म्हटले आहे. (Photo: Reuters)
-
एक्स वर पोस्ट करताना, सूर्या यांनी लिहिले, “मुंबईहून बंगळुरूला परतताना आज दिग्गज नारायण मूर्ती यांच्याशी प्रेरणादायी संवाद झाला. (Photo: Reuters)
-
नारायण मूर्ती यांनी भारतीय आयटी सेवा क्षेत्राचा पाया रचला आणि त्याचे रुपांतर जागतिक पॉवरहाऊसमध्ये केले. त्यांनी इन्फोसिसच्या माध्यमातून लाखो मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये आर्थिक सुबत्ता आणली.” (Photo: Reuters)
-
“आमच्या संभाषणाच्या शेवटी मी विनोदाने म्हटले की, मी त्यांचे आठवड्याचे ७० तास काम करण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेन, ज्यावर ते हसले आणि म्हणाले, ‘मी अशा एकाच व्यक्तीला ओळखतो तो एकमेव व्यक्ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आठवड्याला १०० तास काम करतात”, असे सूर्या यांनी पोस्टच्या शेवटी म्हटले आहे. (Photo: Reuters)
-
मूर्ती यांनी मागे कामाच्या तासांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे ते खूप चर्चेत आले होते. त्यांनी तरुण भारतीयांना राष्ट्रीय उत्पादकता वाढवण्यासाठी आठवड्यातून “किमान ७० तास” काम करण्याचे आवाहन केले होते. (Photo: Tejaswi Surya/X)
-
त्यावेळी, देशभरातून त्यांच्यावर तीव्र टीका झाली होती. तर काहींनी त्यांच्या कामाच्या नीतिमत्तेचे कौतुक केले होते. (Photo: Reuters)
-
दरम्यान, मूर्ती सह-संस्थापक असलेल्या इन्फोसिसने आता एक वेगळा दृष्टिकोन स्वीकारला आहे. द इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, कंपनीने एक धोरण लागू केले आहे, ज्याद्वारे कामाचे तास प्रतिदिन ९.१५ तास करण्यात आले आहे. (Photo: Reuters)
-
महिनाभर या मर्यादेपेक्षा जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता एचआर टीमकडून इशारा दिला जातो. ज्यामध्ये वैयक्तिकृत अहवाल आणि ब्रेक घेण्याच्या टिप्सचा समावेश आहे. (Photo: Reuters)