-
कफ सिरपमुळे देशभरातील अनेक राज्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये आतापर्यंत १८ मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. (फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)
-
सरकार अॅक्शन मोडवर : मध्य प्रदेशात सर्वाधिक १४ मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर मध्य प्रदेश सरकार अॅक्शन मोडवर आलं असून कफ सिरपच्या विक्रीवर बंदी घातली आहे. (फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)
-
तपासासाठी एसआयटी स्थापन : कफ सिरपमुळे खरंच १४ मुलांचा मृत्यू झाला का? त्या मुलांच्या मृत्यूसाठी कफ सिरप जबाबदार आहे का? या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी आता मध्य प्रदेश सरकारने एसआयटी स्थापन केली आहे.(फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)
-
केंद्र सरकारचे निर्देश : या मृत्यूंच्यामागे ‘कफ सिरपचा वापर’ संभाव्य कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.याबाबत आता खबरदारी घेण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत. (फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)
-
डॉक्टरला अटक : कफ सिरपमुळे मुलांचा मृत्यू झाल्याच्या संशयाच्या प्रकरणात मध्य प्रदेश पोलिसांनी मोठी कारवाई केली. छिंदवाडा येथील एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. (फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)
-
तीन राज्यात सिरपच्या विक्रीवर बंदी : मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ सरकारने कफ सिरपच्या विक्रीवर बंदी घातली आहे. (फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)
-
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये लहान मुलांचे मृत्यू झाल्याची प्रकरणं समोर आल्यामागे दूषित औषधं कारणीभूत असल्याचा संशय आहे. विशेषतः Diethylene Glycol (DEG) किंवा तत्सम घातक रसायनं सिरपमध्ये मिसळली गेली असावीत,असा आरोप आहे.(फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)
-
महाराष्ट्र सरकारही अलर्ट : सरकारच्या अन्न औषध प्रशासन विभागाही अलर्ट झालं असून खबरदारीचा उपाय म्हणून टोल फ्री नंबर सुरू करण्यात आला. तसेच कोल्ड्रिफ सिरपची विक्री, वितरण थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.(फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)

भर न्यायालयात हल्ला झाल्यावर सरन्यायाधीश गवई यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…