-
मागील दोन सामन्यात आपल्यापेक्षा अग्रमानांकीत प्रतिस्पर्ध्यांना नमवून अंतिम फेरीत प्रवेश करणारी सिंधू प्रशिक्षक आणि महान बॅडमिंटन खेळाडू गोपीचंद यांच्या खेळाला प्रभावित होऊन बॅडमिंटनमध्ये आली आहे.
-
हैदराबादमध्ये जन्मलेल्या सिंधूचे आई आणि वडिल हे हॉलीबॉल खेळाडू होते त्यामुळे तिच्यात खेळाडूच्या अंगी असणारे गुणठासून भरले आहेत.
सिंधूने मेहबूब अली यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाला सुरुवात केली. त्यानंतर गोपिचंद यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी सिंधू दररोज ५६ कि.मी. अंतर प्रवास करायची. -
प्रशिक्षक गोपिचंद यांनी सिंधूच्या कोर्टवरील तंदुरुस्तीसाठी चॉकलेट आणि हैदराबादी बिर्याणी खाण्यावर बंदी घातली होती
सिंधूने आतापर्यंत ६ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकले असून पहिल्या दहा बॅडमिंटन खेळाडूमध्ये देखील स्थान मिळविले आहे. दुखापतीमुळे तिला अडथळ्यांचा सामना देखील करावा लागला आहे. -
सिंधू आणि गोपीचंद यांनी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भरपुर मेहनत घेतल्याचे तिची आई सांगते. दोघांच्या मेहनतीला यश मिळावे म्हणून सिंधूची आई दररोज मंदीरात प्रार्थना करत असते.
-
गोपीचंद अॅकडमीमध्ये प्रशिक्षण घेतल्यापासून सिंधूच्या कारकिर्दीचा प्रवास गतीमान झाला आहे. जागतिक बॅ़डमिंटन स्पर्धेतही तिने उल्लेखनिय कामगिरी केली आहे. गोपिचंद यांच्या मते सिंधू कधीच हार मानत नाही.
वयाच्या सातव्या वर्षी पी. व्ही,सिंधूने बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात केली. -
बॅडमिंटनच्या कोर्टवर धम्माल खेळ करणारी सिंधू सोशल माध्यमामध्येही सक्रिय असते.

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक