-
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये पॅराग्वेची २० वर्षीय जलतरणपटू लुआना अलोन्सो तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे. (luanalonsom Insta)
-
तिच्या सौंदर्यामुळे तिला पॅरिस ऑलिम्पिकमधून परत पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे. (luanalonsom Insta)
-
लुआना अलोन्सो असे या तरुण महिला पॅराग्वेयन जलतरणपटूचे नाव आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लुआनाची सुंदरता बाकीच्या टीमचे लक्ष विचलित करत होती. (luanalonsom Insta)
-
तिचे सौंदर्य संघातील खेळाडूंचे लक्ष विचलित करत होते. ब्लास्टने दिलेल्या वृत्तानुसार, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अलोन्सोने तिच्या सौंदर्याने अनेकांची मने जिंकली होती, बहुतेक पॅरिस ऑलिम्पिकमधील खेळाडू आणि तिच्यासाठी हे महागात पडले, कारण तिचे सहकारी तिच्या सौंदर्यामुळे आपल्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित करु शकत नव्हते. (luanalonsom Insta)
-
पण यामागील खरी गोष्ट काय आहे? एखाद्या खेळाडूला तिच्या सौंदर्यामुळे खरोखरच ऑलिम्पिकमधून बाहेर केले जाऊ शकते का? (luanalonsom Insta)
-
यासंबंधी इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार वेगळी माहिती समोर आली आहे, ती म्हणजे अशी की लुआना अलोन्सोला तिच्या अयोग्य वर्तनासाठी ऑलिम्पिक गाव सोडण्यास सांगण्यात आले. ती १०० मीटर बटरफ्लाय स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकली नाही. (luanalonsom Insta)
-
पॅराग्वेयन ऑलिम्पिक समितीने तिला बाहेर काढण्याचे कारण तिचे अयोग्य वर्तन असल्याचे सांगितले आहे. समितीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की लुआना ही जलतरणपटू आहे आणि तिने १०० मीटर बटरफ्लाय स्पर्धेत भाग घेतला होता, परंतु तिने केवळ ०.२४ सेकंदांनी पात्रता गमावली. त्यानंतर तिने नियमांचे पालन न करता स्वतःची मर्जी चालवत रात्री उशिरा ऑलिम्पिकचे गाव सोडून डिस्नेलँडला भेट दिली, याशिवाय ऑलिम्पिक खेळाडू म्हणून दिले गेलेले ड्रेस न परिधान करता तिने घरगुती कपडे परिधान केले, याचा परिणाम कुठे ना कुठे संघातील इतर खेळाडूंवर झाला. (luanalonsom Insta)
-
सीओपी मिशनच्या प्रमुख लॅरिसा शेरर म्हणाल्या, “तिची अशी उपस्थिती पॅराग्वे संघामध्ये वेगळं वातावरण निर्माण करत आहे. आम्ही दिलेल्या सूचनेनुसार तिने ऑलिम्पिक गाव सोडल्याबद्दल आम्ही तिचे आभार मानतो, तसेच तिने स्वतः मायदेशी परतण्याचा निर्णय घेतल्याने संघासाठी चांगले झाले आहे. आता संघातील इतर खेळाडू त्यांच्या खेळावर चांगले लक्ष्य केंद्रित करू शकतील” (luanalonsom Insta)
-
दरम्यान, बुधवारी इंस्टाग्रामवर, २० वर्षीय जलतरणपटूने ऑलिम्पिक गावातून हकालपट्टी केल्याच्या बातम्या फेटाळून लावल्या. लुआना अलोन्सोने इंस्टाग्राम स्टोरीजवर स्पॅनिशमध्ये लिहिले,”मला फक्त हे स्पष्ट करायचे आहे की मला कधीही कोठूनही काढून टाकले गेले नाही किंवा बाहेर काढले गेले नाही. त्यामुळे चुकीची माहिती पसरवणे थांबवा. मला कोणतेही विधान करायचे नाही, पण मी माझ्याबद्दल खोटे बोलू देणार नाही.”, दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडल्यानंतर काही वेळातच अलोन्सोने जलतरणातून निवृत्तीची घोषणा केली आहे. (luanalonsom Insta)

“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान