कोणी ४७व्या वर्षी केले पदार्पण तर कोणी ५२व्या वर्षी खेळली अखेरची कसोटी, ‘हे’ आहेत सर्वात वयस्कर क्रिकेटपटू
Oldest Test players : क्रिकेटपटूंच्या वयाकडे खूप लक्ष दिले जाते. वयाची तिसावी पार करताच त्यांचे दिवस मोजायला लागतात. त्याबरोबर निवृत्तीबद्दल चर्चा सुरु होतात. मात्र, क्रिकेटच्या इतिहासात असे खेळाडू आहेत ज्यांनी वयाच्या पन्नाशीनंतरही क्रिकेट खेळले आहे.
विल्फ्रेड ऱ्होड्सने 3 एप्रिल 1930 रोजी किंग्स्टन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध 52 वर्षे आणि 165 दिवस वयात इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले होते. ही त्यांची शेवटची कसोटी होती. (फोटो – आयसीसी)बर्ट आयर्नमोंगर 23 फेब्रुवारी 1933 रोजी सिडनी येथे 50 वर्षे आणि 327 दिवस वय असताना ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंडविरुद्ध खेळले होते. (फोटो – आयसीसी)डब्ल्यूजी ग्रेस यांनी 50 वर्षे आणि 320 दिवस वय असताना, इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1 जून 1899 रोजी नॉटिंगहॅम येथे शेवटचा कसोटी सामना खेळला होता. (फोटो – आयसीसी)जॉर्ज गनने वयाच्या 50 वर्षे 303 दिवस वय असताना वेस्ट इंडिजविरुद्ध 3 एप्रिल 1930 रोज इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले होते. (फोटो – आयसीसी)जेम्स साउथर्टनने 31 मार्च 1877 रोजी वयाच्या 49 वर्षे 139 दिवसांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले होते. (फोटो- स्क्रीनग्रॅब)मीरान बख्श यांनी 12 फेब्रुवारी 1955 रोजी 47 वर्षे 301 दिवस वय असताना भारताविरुद्ध पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी वयाच्या 47 व्या वर्षी पदार्पण केले. (फोटो- पाकिस्तान क्रिकेट)जॅक हॉब्सने 16 ऑगस्ट 1930 रोजी वय 47 वर्षे आणि 249 दिवस असताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले होते. (फोटो – आयसीसी)