-
भारतीय संघाला लॉर्ड्सच्या मैदानावर इतिहास रचण्याची संधी आहे . इंग्लंडविरूद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला जिंकण्यासाठी १९३ धावा करायच्या आहेत. (फोटो- एक्स)
-
त्यामुळे लॉर्ड्सच्या मैदानावर सामना जिंकून शुबमन गिलकडेही मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे. (फोटो- एक्स)
-
दरम्यान कोण आहेत लॉर्ड्सच्या मैदानावर जिंकणारे भारतीय कर्णधार? जाणून घ्या.
(फोटो- एक्स) -
भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी १९८५-८६ इंग्लंड दौऱ्यावर लॉर्ड्सच्या मैदानावर पहिला कसोटी सामना जिंकण्याचा मान पटकावला होता.
(फोटो- एक्स) -
त्यानंतर भारताला लॉर्ड्सवर विजय मिळवण्यासाठी २८ वर्षे लागली. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने २०१४ मध्ये ९५ धावांनी विजय मिळवला होता.
(फोटो- एक्स) -
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने लॉर्ड्सच्या मैदानावर तिसरा विजय मिळवला होता. त्यावेळी केएल राहुल विजयाचा हिरो ठरला होता. हा सामना भारताने १५१ धावांनी जिंकला होता.
(फोटो- एक्स) -
या सामन्यात देखील केएल राहुलने चांगली सुरूवात करून दिली आहे. आता भारतीय संघ हा सामना जिंकणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (फोटो- एक्स)

San Rechal : प्रसिद्ध मॉडेल सॅन रेचेलची आत्महत्या, आर्थिक कारणांमुळे टोकाचं पाऊल उचलल्याची पोलिसांची माहिती