-
रक्षाबंधन २०२५
रक्षाबंधनाचा सण भावा-बहिणीच्या नात्यातील प्रेम आणि पवित्रता दर्शवतो. कालपासून (९ ऑगस्ट) देशभरात रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा केला जात आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपण स्टार भारतीय क्रिकेटपटूंच्या बहिणींच्या व्यवसायाबद्दल माहिती घेऊयात.. (Photo: Social Media) -
भावना कोहली धिंग्रा
स्टार फलंदाज विराट कोहलीच्या बहिणीचे नाव भावना कोहली धिंग्रा आहे. ती विराटचा व्यवसाय सांभाळते. भावना वन८ सिलेक्ट आणि रॉग्न या फॅशन ब्रँडची व्यवस्थापक आहे. विराट कोहलीने २०१२ मध्ये वन८ नावाचा ब्रँड लाँच केला. भावनाचे लग्न उद्योगपती संजय धिंग्रा यांच्याशी झाले आहे. (Photo: Social Media) -
साक्षी पंत
भारताचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतच्या बहिणीचे नाव साक्षी पंत आहे. ती ऋषभपेक्षा मोठी आहे. साक्षी नॅशनल फार्मसी असोसिएशनशी संबंधित आहे. ती सोशल मीडियावरही लोकप्रिय आहे. तिचे इंस्टाग्रामवर २ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. (Photo: Social Media) -
नैना जडेजा
अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याला नैना जडेजा आणि पद्मिनी जडेजा या दोन मोठ्या बहिणी आहेत. नैना या काँग्रेस नेत्या आहेत. रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा भाजपमध्ये आहे. रिवाबा या गुजरातच्या जामनगर उत्तर मतदारसंघाच्या आमदार आहे. (Photo: Social Media) -
जुहिका बुमराह
वेगवान स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या बहिणीचे नाव जुहिका आहे. जुहिका तिच्या भावापेक्षा मोठी आहे. ती शाळेत शिक्षिका होती. तथापि, जुहिका आता व्यवसायाने मेकअप आर्टिस्ट आहे. तिने बुमराहला क्रिकेटर बनण्यास मदत केली. (Photo: Social Media) -
शहनील गिल
भारतीय कसोटी संघाचा तरुण कर्णधार शुभमन गिलच्या बहिणीचे नाव शहनील गिल आहे. ती शुभमनपेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे. शहनील सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. तिचे इंस्टाग्रामवर चार लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचे भाऊ शुभमनसोबतचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात. (Photo: Social Media) -
(Photo: Social Media) हेही पाहा- Who Is Karishma Kotak : WCL च्या अँकरवर स्पर्धेच्या मालकाचा जडला जीव; थेट प्रक्षेपणादरम्यान केलं प्रपोज…

HR’s Post on Unethical Resignaton : १० वाजता पगार, १० वाजून ५ मिनिटांनी पाठवला राजीनामा; नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करणारी एचआरची पोस्ट चर्चेत