-
क्रिकेटचा देव म्हणून ओळख जाणारा सचिन तेंडुलकर लेक, पत्नी आणि कुटुंबासह फिरायला गेला आहे.
-
सचिनने मध्यप्रदेश येथील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर असलेल्या महेश्वरला भेट दिली आणि तेथील फोटो शेअर केले आहेत.
-
महेश्वर हे ठिकाण नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं आहे. याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ही कर्मभूमी आहे. येथील अहिल्याबाईंच्या पुतळ्याच्या येथील सचिनने फोटो शेअर केला आहे.
-
सचिनने शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्याची लेक सारा तेंडुलकर, पत्नी अंजली तेंडुलकर आणि होणारी सून सानिया चंडोकदेखील आहे. याशिवाय काही इतर जवळची लोकदेखील आहेत.
-
तेंडुलकरांच्या कुटुंबाच्या सहलीत सानिया चंडोकच्या या फोटोमधील उपस्थितीने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.(वरील सर्व फोटो-@SachinTendulkar)
-
सानिया चंडोक आणि अर्जुन तेंडुलकर यांचा साखरपुडा झाल्याची बातमी समोर आली होती. पण तेंडुलकर कुटुंबाने याबाबत काहीच अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही.(व्हायरल फोटो)
-
सचिन तेंडुलकरच्या आईच्या वाढदिवसाला देखील सानिया चंडोक उपस्थित होते. ज्याचे फोटो सचिनने शेअर केले होते. जेव्हा अर्जुन आणि सानिया चंडोक साखरपुड्याच्या चर्चांनंतर पहिल्यांदा एकत्र दिसले होते.(फोटो-@SachinTendulkar)
-
याचबरोबर सारा तेंडुलकरच्या नव्या फिटनेस अकादमीच्या उद्घाटनलादेखील सानिया चंडोक उपस्थित होती.(फोटो-@SachinTendulkar)
-
सारा, सचिन, अंजली आणि सचिनच्या सासूबाईंसह सानिया चंडोकनेही उद्घाटनाची रिबिन कापली. सचिनने हे फोटो शेअर केले होते.(फोटो-@SachinTendulkar)
-
सारा तेंडुलकर आणि सानिया चंडोक खूप जवळच्या मैत्रिणी आहेत. साखरपुड्याच्या चर्चांआधीपासून साराने तिच्याबरोबरचे फटो अनेकदा शेअर केले आहेत.(फोटो-@SaraTendulkar)

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी