-
या स्पर्धेत भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. गिल फलंदाजीचा कसून सराव करताना दिसून आला आहे. (फोटो- बीसीसीआय)
-
भारतीय संघातील आक्रमक फलंदाज अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा देखील कसून सराव करताना दिसून येत आहेत. (फोटो- बीसीसीआय)
-
या स्पर्धेत भारतीय संघाच्या फिरकी गोलंदाजी आक्रमणाची जबाबदारी वरूण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांच्यावर असणार आहे. (फोटो- बीसीसीआय)
-
संघातील सर्वात अनुभवी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यादेखील फलंदाजीचा सराव करताना दिसून आला आहे. (फोटो- बीसीसीआय)
-
शुबमन गिल सलामीला फलंदाजीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे, मग संजू सॅमसन कितव्या क्रमांकावर फलंदाजीला येणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (फोटो- बीसीसीआय)
-
भारतीय संघ आशिया चषकासाठी २०२५ स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघ या स्पर्धेसाठी दुबईत दाखल झाला असून खेळाडूंनी सराव करायला सुरूवात केली आहे. बीसीसीआयने भारतीय खेळाडू सराव करत असतानाचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो- बीसीसीआय)

पुढच्या वर्षी बाप्पा उशिरा येणार! ‘या’ तारखेला साजरी केली जाईल गणेश चतुर्थी