-
भारतीय संघातील युवा फलंदाज शुबमन गिल सध्या आशिया चषक २०२५ स्पर्धा खेळण्यात व्यस्त आहे. या स्पर्धेत गिलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच तो अभिषेक शर्मासोबत मिळून डावाची सुरूवात करताना देखील दिसून येत आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
गिलला भारतीय क्रिकेटचा प्रिन्स अशी उपाधी क्रिकेट चाहत्यांकडून देण्यात आली आहे. याआधी विराटला किंग आणि रोहितला हिटमॅन अशी उपाधी देण्यात आली आहे. दरम्यान गिलचं टोपण नाव काय आहे? हे खूप कमी लोकांना माहीत आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
विराटला चिकू तर धोनीला माही या टोपण नावाने ओळखलं जातं. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तर गिलला ‘काका’ या टोपण नावाने ओळखलं जातं. काही मुलाखतींमध्ये त्याने याबाबत खुलासा केला आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
गिलला घरी काका या नावानेच हाक मारली जाते. प्रामुख्याने त्याची आई याच नावाने त्याला बोलवते, असं गिलने मुलाखतीत सांगितलं आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
काका या शब्दाचा अर्थ काय? असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल. तर काका पंजाबी भाषेतील एक सामान्य शब्द आहे. ज्याचा अर्थ लहान मुलगा किंवा बाळ असा होतो. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

“एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…