-
द इंडियन एक्सप्रेसकडून ‘एक्सप्रेस अड्डा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने देखील हजेरी लावली होती. सूर्याने द इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका आणि द इंडियन ग्रुपचे उप सहयोगी संपादक देवेंद्र पांडे यांच्यासोबत चर्चा केली. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या मुलाखतीत त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील अनेक मजेशीर किस्से सांगितले. दरम्यान त्याने आवडता खेळ कोणता याबाबत देखील खुलासा केला आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या मुलाखतीत त्याला क्रिकेट व्यतिरिक्त आवडता खेळ कोणता?असा प्रश्न विचारण्यात आला होता. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या प्रश्नाचं उत्तर देताना त्याने पिकलबॉल या खेळाचं नाव घेतलं. (फोटो- इंस्टाग्राम)
-
पिकलबॉल हा जगभरात झपाट्याने प्रसिद्ध होत असलेला खेळ आहे. हा खेळ टेनिस, टेबल टेनिस आणि बॅडमिंटनचं मिश्रण असलेला खेळ आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
यासह क्रिकेट व्यतिरिक्त कधी कधी फुटबॉलचे सामना पाहायला आवडतात, असंही त्याने सांगितलं. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

‘कर्करोग जिंकला, यंदा शेवटची दिवाळी पाहतोय’, २१ वर्षीय तरुणाची पोस्ट व्हायरल; लोक म्हणाले…