-
भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नुकताच इंडियन एक्सप्रेसच्या एक्सप्रेस अड्डाला उपस्थिती लावली होती. यादरम्यान त्याने अनेक इतर विषयांबाबत टॅटूबद्दलही सांगितलं.
-
सूर्यकुमार यादवने त्याच्या शरीरावर अनेक विविध टॅटू काढले आहेत, जे आपण पाहिलेत आणि त्या प्रत्येक टॅटूमागे एक अर्थ दडलेला आहे.
-
सूर्यकुमार यादवने पहिला टॅटू २०१३-१४ मध्ये काढला होता. सूर्याने पहिला टॅटू त्याच्या आईवडिलांसाठी काढला होता आणि त्यानंतर त्याने पत्नी देविशासाठी टॅटू काढला आहे.
-
सूर्यकुमार यादवला मुलाखतीदरम्यान विचारण्यात आलं की भारतीय क्रिकेटपटूंसाठी टॅटू काढायचा असेल तर तो कोणती डिझाईन निवडेल, यासाठी त्याला रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, सलमान आघा आणि शुबमन गिल यांची नावं देण्यात आली.
-
सूर्यकुमार यादवने रोहित शर्मासंबंधित टॅटू काढायचं असेल तर गार्डन असं म्हटलं आणि एकच हशा पिकला.
-
विराट कोहलीसाठी GOAT
-
जसप्रीत बुमराहसाठी Brother
-
पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघासाठी Stop
-
शुबमन गिलसाठी हसणारा इमोजी (फोटो सौजन्य-@Suryakumar yadav instagram, लोकसत्ता संग्रहित फोटो)

आनंदाने उड्या मारतील हे लोक! २०२६ मध्ये कोट्याधीश होतील ५ राशी, बाबा वेंगाच्या भविष्यवाणी; नोटांचा होईल पाऊस