-
झहीर खान, सागरिका घाटगे आणि त्यांचा लेक फतेहसिंग यांनी घरात लक्ष्मीपूजन करत सण साजरा केला.
-
लक्ष्मीपूजनाचे फोटो झहीर खानची पत्नी सागरिका घाटगे हिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.झहीर आणि सागरिका यांची त्यांच्या लेकाबरोबर ही पहिली दिवाळी आहे.
-
सागिरकाने देवीचा फोटो आणि कलश ठेवत लक्ष्मीपूजन केल्याचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये गणपतीचं चांदीचं नाणही आहे.
-
सागरिकाने देवघरात पूजा करत असल्याचे पुढच्या फोटोमध्ये आपल्याला दिसतंय. दरम्यान देवघराला फुलांच्या माळांनी आरास करण्यात आली आहे.
-
खान कुटुंबाने पूजेनंतर एकत्र फॅमिली फोटोही काढला आहे. ज्यात त्यांचा कुत्राही आहे.
-
सागरिकाने घराचे छान फोटोदेखील चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
सागरिका आणि झहीर मराठी सणांपासून ते ईदपर्यंतचे सर्व सण मोठ्या थाटामाटात घरात साजरे करतात.
-
सागरिका प्रत्येक सणाचे कुटुंबाबरोबरचे फोटो शेअर करत असते. दिवाळीनिमित्त घरात छान सजावटही केल्याचा फोटो पाहायला मिळत आहे.
-
सागरिकाच्या देवघरात कुलस्वामिनी देवीचा फोटो आहे. तर गणपती बाप्पा, राम लक्ष्मण सीता, बाळकृष्णाची मूर्तीही आहे. प्रत्येक मूर्ती आणि फोटोसाठी खास आसनदेखील आहे. देवघरात सागरिकाने छान फराळाचं ताटही भरून ठेवलं आहे.
-
सागरिका खाली फरशीवर बसून लेकाशी खेळतानाचा गोड फोटो सर्वांचं मन जिंकतोय.
-
झहीर खानच्या छान रंगीबेरंगी आकाशकंदील लावण्यात आला आहे.याचबरोबर फुलांची रांगोळी आणि दिव्यांच्या आरासने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. (फोटो सौजन्य-@
sagarikaghatge Instagram)

हार्ट अटॅक येण्याआधी पायांमध्ये ‘ही’ ५ लक्षणं दिसतातच; साधी वाटणारी पण जीवघेणी लक्षणं अजिबात दुर्लक्ष करु नका