-
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघातील स्टार फलंदाज विराट कोहली पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. विराट कोहली या सामन्यात शून्यावर बाद होऊन माघारी परतला. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
आता दुसऱ्या वनडेत दमदार पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्याआधी विराट कोहली नेट्समध्ये कसून सराव करताना दिसून आला आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
अॅडलेडमध्ये विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये दमदार शतकी खेळी केली होती.पहिल्याच दौऱ्यावर, जेव्हा इतर फलंदाज फ्लॉप ठरले होते. त्यावेळी विराटने ११६ धावांची दमदार खेळी केली होती. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
अॅडलेडमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत विराट कोहली अव्वल स्थानी आहे. विराटने १२ सामन्यांमध्ये ६५ च्या सरासरीने ९७५ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारतीय कर्णधार म्हणून त्याने याच मैदानावर पदार्पण केलं होतं. पदार्पणात त्याने ११५ आणि १४१ धावांची दमदार खेळी केली होती. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तर वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना त्याने या मैदानावर ४ सामन्यांमध्ये ६१ च्या सरासरीने २४४ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

हार्ट अटॅक येण्याआधी पायांमध्ये ‘ही’ ५ लक्षणं दिसतातच; साधी वाटणारी पण जीवघेणी लक्षणं अजिबात दुर्लक्ष करु नका