-
महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मधील अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघांमध्ये खेळवला जाणार आहे.
-
दक्षिण आफ्रिका महिला संघाने सेमीफायनल सामन्यात इंग्लंडचा एकतर्फी पराभव अंतिम फेरी गाठली. या सामन्यात कर्णधार लॉरा वुल्फार्ट हिने शतकी खेळी केली.
-
भारतीय संघाने ७ वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या ऑस्ट्रेलिया संघावर ऐतिहासिक विजय मिळवत अंतिम सामन्यात धडक मारली. जेमिमा रॉड्रीग्जने या सामन्यात शतकी खेळी केली.
-
सेमीफायनल सामन्यात जेमिमा रॉड्रीग्जने कर्णधार हरमनप्रीत कौर आणि इतर फलंदाजांच्या मदतीने नाबाद शतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
-
भारतीय महिला संघ महिला विश्वचषकाच्या इतिहासात तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात पोहोचला आहे. त्यामुळे यंदा संघ ट्रॉफी पटकावणार का यावर सर्वांच्या नजरा आहेत.
-
महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यापूर्वी कर्णधारांचं ट्रॉफीबरोबर फोटोशूट झाल्याचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.
-
भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वुल्फार्ट यांनी महिला विश्वचषकाच्या ट्रॉफीबरोबर शूट केलं आहे.
-
नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये हा अंतिम सामना खेळवला जाणार असून शेजारी असलेल्या कोर्टयार्ड हॉटेसच्या टेरेसवर हे फोटोशूट करण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य – @BCCI Women, @Proteas Woman)
अगं बाई! साडीतील काकूंचा ठुमका पाहून थक्क झाले नेटकरी; VIDEO पाहून म्हणाले “आंटी तर लहानपणी…..