-
भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर इतिहास घडवला!. महिला क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दमदार कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विश्वविजेतेपद पटकावले. त्यानंतर संपूर्ण मैदान ‘भारतमाता की जय’च्या जयघोषाने दणाणून गेले होते.
-
दक्षिण आफ्रिकेची महत्त्वाची विकेट घेतल्यानंतर हरमनप्रीत कौर आणि शेफाली वर्मा यांनी एकमेकांना आलिंगन देत शानदार जल्लोष केला.
-
या अंतिम सामन्यात भारताच्या डावाची मजबूत सुरुवात करून देताना स्मृती आणि शेफाली यांनी जबरदस्त समन्वय दाखवला. दोघी विकेटदरम्यान धावा जमा करताना ज्या आत्मविश्वासाने खेळल्या, त्या खेळामुळे त्यांनी भारतीय चाहत्यांच्या हृदयांत स्थान मिळवले.
-
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धडा शिकविताना दीप्ती शर्माने अप्रतिम चौकार लगावत भारताचा धावफलक वेगाने पुढे नेला. तिच्या संयमी, पण आक्रमक फलंदाजीने संघाचा पाया मजबूत झाला.
-
प्रत्येक विकेटनंतर भारतीय खेळाडूंचा उत्साह बघण्यासारखा होता. झुंजार गोलंदाजांनी घेतलेल्या प्रत्येक विकेटवर मैदानात जल्लोष आणि एकतेचा सुंदर आविष्कार पाहायला मिळाला.
-
शेवटचा चेंडू टाकल्यानंतर संपूर्ण संघ मैदानावर धावत आला आणि विजयी जल्लोषात सामील झाला. विश्वचषकाची ट्रॉफी उंचावत सर्व खेळाडूंनी देशाचे नाव जगभरात उज्ज्वल केले.
-
कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मंधाना यांनी एकमेकींना मिठी मारत हा ऐतिहासिक विजय साजरा केला. त्या क्षणी संपूर्ण देशाचा अभिमान त्यांच्या डोळ्यांत झळकत होता.
-
ही केवळ विजयाची कहाणी नाही, तर भारतीय महिला क्रिकेटच्या नव्या युगाची सुरुवात आहे.समर्पण, मेहनत व जिद्द यांच्या जोरावर भारताने जागतिक महिला क्रिकेट जगतामध्ये विश्वचषक जिंकून आपल्या कीर्तीचा झेंडा रोवला आहे.
INDW vs SAW: अमोल मुझुमदारांचे ते २ शब्द कानी पडताच भारतीय संघात उत्साह संचारला, फायनलआधी टीम इंडियाला काय सांगितलं होतं?