-
‘आयएनएस विराट’चे बोधवाक्य – 'जलमेव यस्य, बलमेव तस्य' असे आहे. युद्धनौकेवर १६ सी हॅरिअर्स, ४ सीकिंग ही लढाऊ विमाने आणि २ चेतक आणि ४ ध्रुव हेलिकॉप्टर्स तैनात.
-
१९८६ साली भारतीय नौदलाकडून 'आयएनएस विराट'ची खरेदी करण्यात आल्यानंतर १९८७ साली मे महिन्यात ‘आयएनएस विराट’ असे नामकरण करण्यात आले. (एक्स्प्रेस छायाचित्र)
-
'आयएनएस विराट'चे मूळ नाव एचएमएस हर्मिस (इंग्लंडचे शाही नौदल) होते. ती शाही नौदलात २५ नोव्हेंबर १९५९ साली दाखल झाली होती. (एक्स्प्रेस छायाचित्र)
-
‘आयएनएस विराट’ची लांबी २२६.५ मीटर्स (७४३ फूट) असून वेग ताशी २८ सागरी मैल (प्रतितास ५२ किलोमीटर्स) आहे.
-
सर्वाधिक सेवा केल्याने या युद्धनौकेची गिनीज बुकच्या जागतिक विक्रमात नोंददेखील झाली आहे. या युद्धनौकेवरील विमानांनी एकूण २२ हजार ६२२ तासांचा प्रवास केला आहे.
-
जगातील सर्वात जुनी विमानवाहू नौका असलेली 'आयएनएस विराट' तब्बल पाच दशकांच्या सेवेनंतर विराट नौदलाच्या सेवेतून निवृत्त होते आहे. (एक्स्प्रेस छायाचित्र)
-
तब्बल २७ वर्ष 'आयएनएस विराट' ब्रिटिशांच्या रॉयल नेव्हीचा भाग होती. (एक्स्प्रेस छायाचित्र)
-
‘आयएनएस विराट’च्या सेवानिवृत्तीनंतर या युद्धनौकेचा संग्रहालयात समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र यावर संरक्षण खात्याने अजून निर्णय दिलेला नाही. (एक्स्प्रेस छायाचित्र)
-
‘आयएनएस विराट’ ही तब्बल ५८ वर्षे सेवा करीत असलेली जगातील एकमेव युद्धनौका ठरली आहे. (एक्स्प्रेस छायाचित्र)

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक