-
लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमध्ये ट्रेड हाऊस इमारतीला लागलेल्या भीषण आगीत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२ जण जखमी झाले आहेत. (छाया सौजन्य : निर्मल हरिनंदन)
-
इमारतीच्या टेरेसवर असलेल्या मोजोस पबमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. (छाया सौजन्य : निर्मल हरिनंदन)
-
या परिसरात रेस्टॉरेंट्स आणि पब आहेत. (छाया सौजन्य : निर्मल हरिनंदन)
-
पबमध्ये पार्टी सुरू असताना हा प्रकार घडल्याचं कळतं. (छाया सौजन्य : निर्मल हरिनंदन)
-
मृतांमध्ये पबमध्ये आलेल्या तरुण-तरुणींचा समावेश आहे. (छाया सौजन्य : निर्मल हरिनंदन)
-
आग इतकी भीषण होती की टेरेसवर बांधण्यात आलेलं बांबू आणि प्लास्टिकचं संपूर्ण छप्पर जळून खाक झालं. (छाया सौजन्य : निर्मल हरिनंदन)
-
आगीचे लोट कमला मिल कंपाऊंडच्या बाहेरूनही स्पष्ट दिसत होते. (छाया सौजन्य : निर्मल हरिनंदन)
-
याच इमारतीत इतरही काही ऑफीस आहेत. (छाया सौजन्य : निर्मल हरिनंदन)
-
रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास लागलेली आग अग्नीशमन दलाच्या साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर विझली. (छाया सौजन्य : निर्मल हरिनंदन)
-
घटनास्थळी मुंबईचे पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला . (छाया सौजन्य : निर्मल हरिनंदन)
-
घटनेत मृत्यू झालेल्यांची ओखळ अद्याप पटलेली नसून जखमींवर मुंबईच्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (छाया सौजन्य : निर्मल हरिनंदन)
-
या घटनेनंतर टेरेसवरील रेस्टॉरेंट्स आणि पबच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (छाया सौजन्य : निर्मल हरिनंदन)
-
(छाया सौजन्य : निर्मल हरिनंदन)
-
(छाया सौजन्य : निर्मल हरिनंदन)

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल