-
देशात १४ एप्रिल रोजी लॉकडाउनचा पहिला टप्पा संपला. त्यानंतर केंद्र सरकारनं ३ मे पर्यंत लॉकडाउनला मुदतवाढ दिली. ही मुदतवाढ देणार याची सगळ्यांनाच कल्पना होती. मात्र, ३ मे नंतर परिस्थिती पूर्वपदावर येईल आणि लॉकडाउन वाढणार नाही. अशी स्वप्न काही जणांना पडत होती. त्यांच्या स्वप्नांचा भंग झाला आहे. (फोटो सौजन्य – ट्विटर)
-
लॉकडाउनमुळे निम्मी उन्हाळी सुटी घरात गेल्यानं काहीजणांनी ३ मे नंतर बाहेर जाता येईल म्हणून बेत आखायला सुरूवात केली होती. त्यावर पाणी फेरलं गेलं.
-
देशात करोना शिरकाव झाल्यानंतर केंद्रानं काही बंधन घातली होती.
-
करोनाचा झपाट्यानं प्रसार होत असल्याचं लक्षात आल्यानंतर केंद्र सरकारनं लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला. याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
-
२१ लॉकडाउन दिवसांचा १४ एप्रिल रोजी संपणार होता. मात्र, परिस्थिती चिंताजनक असल्यानं अनेक राज्यांनी लॉकडाउन वाढवण्याची मागणी केंद्राकडं केली होती.
-
परिस्थितीचा आढावा घेऊन, तज्ज्ञांशी चर्चा करून केंद्र सरकारनं राज्यांच्या मागणीचा विचार केला. केंद्रानं पुन्हा १५ एप्रिल ते ३ मे पर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवला.
-
१५ ते ३ मे या कालावधीत परिस्थिती नियंत्रणात येऊन लॉकडाउन उठवला जाईल किंवा बरीच बंधन शिथिल होतील, असा कयास काही जणांनी लावला होता. पण, त्यांचा भ्रमनिरास झाला आहे.
-
काही राज्यांनी ३ मे नंतरही काही दिवस लॉकडाउन वाढविला जावा, अशी मागणी केली होती. केंद्रीय गृहमंत्रालयानं ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील बंधन काही प्रमाणात शिथिल करत, लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला.
-
३ मे नंतर ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील लोकांना दिलासा मिळाला असला, तरी जिल्हाबंदी आणि सार्वजनिक वाहतूक कमी प्रमाणात होणार आहे.
-
दोन आठवड्यांची मुदतवाढ दिल्यानंतर लॉकडाउन १७ मे पर्यंत चालणार आहे. त्यानंतरही रेड झोन मधील स्थिती कायम राहिल्यास बंधनं कायम ठेवली जाऊ शकतात. पण, यात उन्हाळी सुटीचे बेत आखलेल्यांची चांगलीच नाराजी झाली आहे.
-
लॉकडाउन वाढवला असला, तरी सरकारनं अडकलेल्या नागरिकांना परत घरी जाण्यासाठी परवानगी दिली आहे.
-
लॉकडाउनच्या काळात अनेकांसमोर काय करावं असा प्रश्न पडला आहे.
-
अनेकांनी वेब सीरिज, सिनेमे यांचा आधार घेत वेळ घालवण्यास प्राधान्य दिल्याचं दिसतं.
-
बाहरेगावी अडकलेल्यांची अवस्था मात्र, सध्या वाईट आहे.
-
ज्यांनी एप्रिल आणि मे मध्ये बाहेर फिरण्याचं नियोजन केलं होतं. त्यांना सध्या घरातच दिवस काढावे लागत आहेत.

“मी १० वी नापास, तो बँकर…”, मराठमोळी अभिनेत्री पतीबद्दल म्हणाली, “मी त्याच्याशी लग्न करण्यासाठी…”