-
ठाणे : लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शासनानं उद्योग-व्यवसायांना थोडी शिथिलता दिल्याने छोट्या मच्छिमारांनीही व्यावसायाला सुरुवात केली आहे. खाडीत दिवसभर मच्छिमारी केल्यानंतर स्थानिक मच्छिमार खारफुटीने भरलेल्या छोट्या उपनद्यांमधून घराकडे निघाले असताना त्यांची टिपलेली सुंदर छबी. (सर्व छायाचित्रे – अमित चक्रवर्ती)
-
खाडीतील माशांची संख्या कमी होण्याव्यतिरिक्त लॉकडाऊनमुळे साठवणुकीसाठी बर्फाचा अभाव ही या लहान मच्छीमारांना सध्या भेडसावणारी एक मोठी समस्या आहे.
-
खाडीतील खारफुटीचे जंगल, समुद्राला मिळणाऱ्या छोट्या उपनद्या आणि त्यात छोट्या बोटींचा विहार हे निसर्गाचे दृश्य पाहून मनमोहित होते.
-
गर्द हिरव्या झाडींमधून नितळ पाण्याच्या पृष्ठभागावर निर्माण झालेले मच्छिमार आणि बोटींचे प्रतिबिंब विलोभनीय आहे.
-
स्थानिक मच्छिमारांच्या या व्यवसायावर करोनाचं सावट आहे. त्यामुळे या मच्छिमारांनी काम करीत असताना तोंडाला रुमाल आणि मास्क लावले आहेत.
-
-
मासेमारी झाल्यानंतर किनाऱ्यावर लागलेल्या बोटींचे अप्रतिम दृश्य.

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”