-
मुंबईतल्या ड्रग्ज प्रकरणावरुन सध्या महाविकास आघाडी आणि एनसीबीमध्ये चांगलीच टक्कर होताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक रोज नवनवे आरोप करत एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर टीका करत आहेत.
-
शनिवारी नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी यास्मिन वानखेडे यांचा उल्लेख करत त्यांच्यावरही टीका केली आहे.
-
त्यांचा फ्लेचर पटेल यांच्यासोबतचा फोटो शेअर करत नवाब मलिकांनी त्यांना लेडी डॉन संबोधलं होतं. त्यानिमित्ताने जाणून घेऊयात कोण आहेत यास्मिन वानखेडे…
-
यास्मिन या एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची बहीण आहेत. त्या पेशाने वकील आहे.
-
त्या मनसेच्या चित्रपट सेनेच्या पदाधिकारी असल्याचीही माहिती मिळत आहे. त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तसा उल्लेखही आढळतो.
-
काही दिवसांपूर्वीच यास्मिन यांनी इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या भावाच्या कामगिरीचं कौतुक करण्याऐवजी त्याच्यावर पाळत ठेवली जात असल्याची खंत व्यक्त केली होती.
-
“एनसीबीने हा फ्लेचर पटेल कोण आहे याचा खुलासा करावा. समीर वानखेडे यांच्याशी त्यांचा काय संबंध आहे? त्यांच्या कुटुंबातील लोकांसोबत ते फोटो टाकत आहेत. माय लेडी डॉन सिस्टर नावाने टॅग करत आहेत. समीर वानखेडे यांचा या फ्लेचर पटेलशी काय संबंध आहे?,” अशी विचारणा नवाब मलिक यांनी केली होती.
-
यास्मिन यांनी मलिकांना लगेचच प्रत्युत्तरही दिलं होतं. पुरावे द्या आणि मग बोला असं म्हणत त्यांनी मलिक यांना आव्हान दिलं आहे.
-
मलिक आधार नसलेले आरोप करत आहेत. माझ्या राजकीय पदाचा आणि कामाचा त्यांनी आदर करायला हवा, असंही त्या म्हणाल्या.
-
समाजाला ते चुकीची प्रेरणा देत आहेत, त्यांना हे समजायला हवं, अशा शब्दात त्यांनी नवाब मलिक यांना सुनावलं आहे.

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल