-
दिवाळी सणाच्या निमित्ताने सध्या सोनपापडी चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. सोनपापडी या मिठाईवरती मोठ्या प्रमाणात मीम्स होत आहेत.
-
हा प्रकार इतका वाढला की ट्विटरवर #Soan Papdi ट्रेंडिंगला आहे. अनेकांनी सोनपापडीवरचे मीम्स शेअर केले आहे.
-
फक्त सोशल मीडिया युजर्सच नव्हे तर स्विगी, ट्विटर, टिंडरसारख्या मोठ्या ब्रँड्सनी सुद्धा या ट्रेंडमध्ये सहभाग नोंदवला आहे.
-
दिवाळीच्या या सणानिमित्त एकमेकांना मिठाई देत आनंद वाटला जातो.
-
यात सगळ्यात जास्त सोनपापडी ही मिठाई वाटली जाते असं नेटिझन्सचं म्हणणं आहे.
-
प्रत्येकजण सोनपापडी भेट देतो आणि सोनपापडीच त्याला भेट म्हणून मिळते, असं नेटिझन्सच्या या मीम्समधून दिसून येत आहे.
-
काहींनी तर या सोनपापडीवर कविताही केल्या आहेत. सोनपापडी या विषयावर भरलेलं कविसंमेलन असा एक व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.
-
सध्या चर्चेत असलेली वेब सीरीज स्क्वीड गेम्स याच्या आधारावरुनही मीम्स केली जात आहेत.
-
काही जणांनी दिवाळीत मिळालेल्या सोनपापडीचं दुकानंच उघडण्याचा विचार करत असल्याचं बोलून दाखवलं आहे.
-
तर काही जणांनी सोनपापडी आणि काजूकतलीच्या भरमसाठ वापरावर खोचक टीका केली आहे.
-
तुम्ही या दिवाळीत तुमच्या नातेवाईकांना कोणती मिठाई भेट दिलीत?
-
सर्व मीम्स सौजन्य – ट्वीटर

रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीजवळ सिंह आला अन् वास घेत पुढे केलं असं काही की…; VIDEO पाहून भरेल धडकी