-
मोदी सरकारने केलेली गॅस दरवाढ आणि राज्यातील शिंदे सरकारने केलेली वीज दरवाढ तसेच जेवणावर पाच टक्के जीएसटी लावण्याचा घेतलेल्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पुण्यात आंदोलन करण्यात आले.
-
पुण्यातील बालगंधर्व चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हे आंदोलन करण्यात आले.
-
यावेळी गरिबी, महागाई आणि बेरोजगारी नावाचे मुखवटे घालून तरूणी आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या.
-
तसेच, यावेळी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
-
या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहारध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले.
-
यावेळी ते म्हणाले की, “मागील ७५ वर्षातील सर्वात मोठी महागाई केंद्र सरकारने केली आहे.”
-
“ सतत पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढ करून सर्व सामान्यांचे जगणे कठीण केले आहे. त्यामुळे आज आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहोत.”
-
“ आज श्रीलंकामध्ये महागाईमुळे काय परिस्थिती झाली आहे, हे पाहून तरी केंद्र सरकारने महागाई नियंत्रणात आणावी.”
-
“ अन्यथा आपल्या इथे देखील अशी परिस्थिती होऊ शकते.” असा इशारा देखील जगताप यांनी दिला.
-
तसेच, राज्यात एकनाथ शिंदे यांचे सरकार येऊन काही तास होत नाही, तोच वीज दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.
-
“राज्यातील ‘ईडी’ सरकारला सत्ता स्थापन करताना जो काही खर्च झाला. त्याची वसुली सर्व सामान्य जनतेच्या वीज दरवाढीमधून करायची हे स्पष्ट झालं आहे.”, असा आरोपही त्यांनी केला.
-

IPL Playoffs: आरसीबीच्या विजयाने या ५ संघांचं टेन्शन वाढलं! कोणते ४ संघ प्लेऑफ गाठणार? पाहा संपूर्ण समीकरण