-
राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात भाषण केलं. यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होते आहे
-
राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात केलेल्या भाषणात चीनचं तोंडभरून कौतुक केलं आहे. चीनचं व्यवहार चातुर्य, शांतताप्रिय देश असणं हे जगात किती महत्त्वाचं आहे हे राहुल गांधी म्हणाले
-
विद्यार्थ्यांना उद्देशून केलेल्या या संबोधनात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून टीका केली आहे. पंतप्रधान मोदी त्यांचा अजेंडा देशावर थोपवू पाहात आहेत असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
-
जो विचार आपला भारत देश कधीही स्वीकारू शकणार नाही असाच विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इथल्या जनतेवर थोपवू पाहात आहेत. अशात आम्ही या विचाराविरोधात लढा देत आहोत
-
भारतात हिंदू, मुस्लिम, शिख, ख्रिश्चन अशा सगळ्या धर्मांचे लोक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदू वगळून इतर धर्मीय लोकांना कमी लेखत आहेत असाही आरोप राहुल गांधी यांनी भाषणात केला.
-
राहुल गांधी यांनी भाषणात पेगासॅसचा मुद्दाही उपस्थित केला. माझा फोन टॅप केला गेला असंही त्यांनी भाषणात सांगितलं.
-
राहुल गांधी यांनी भाषण करताना चीनचं आणि तिथल्या पायाभूत सुविधांचं कौतुक केलं आहे. त्यावर भाजपाने टीका केली आहे
-
राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात लर्निंग टू लिसनिंग या विषयावर व्याख्यान दिलं.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं धोरण देशाला मारक आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांच्या या भाषणावर भाजपाने काडडून टीका केली आहे. राहुल गांधी यांनी देशाचा अपमान केला असं भाजपा नेत्यांनी म्हटलं आहे.
-
राहुल गांधींनी आपल्या भाषणात विविध मुद्दे मांडले,काश्मीर हे कथित दहशतवादाचं केंद्र आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे

सरन्यायाधीश भूषण गवई यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची तातडीने भेट; मोठी घडामोड घडणार?