-
Mumbai – Pune Expressway Maharashtra: मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली जवळ झालेल्या भीषण अपघातात १ जण ठार तर जवळपास २५ जण जखमी झाले आहेत. (Express Photos)
-
खंडाळा घाटात मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ट्रेलरने १५ ते १६ वाहनांना जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली.
-
पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ट्रेलरचे खंडाळा घाटात तीव्र उतारावर ब्रेक निकामी झाल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
-
ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे ट्रेलर वरील नियंत्रण सुटले.
-
ट्रेलर समोरील वाहनांना ठोकर देत तसाच पुढे जात राहिला, दिड ते दोन किलोमीटरच्या पट्ट्यात या ट्रेलरने एकामागून एक वाहनांना धडक दिली.
-
यामध्ये लहान वाहनांचे प्रचंड नुकसान झाले.
-
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथके, पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले त्यांनी अपघात ग्रस्तवाहनांमधील जखमींना बाहेर काढून खोपोली आणि पनवेल येथील रुग्णालयात दाखल केले.
-
या अपघातात एक प्रवाश्याचा मृत्यू झाला असून काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
-
सध्या २० ते २५ प्रवाश्यांना खोपोली येथील नगर पालिकेच्या रुग्णालयात आणले आहे.
-
दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झाली असून अपघात ग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने दिला सुखद धक्का, शेअर केले साखरपुड्याचे फोटो, होणारी बायको आहे तरी कोण?