-
टाइम मासिकाने या पुरस्काराची ही परंपरा १९२७ मध्ये सुरू केली. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनाही यापूर्वी हा मान मिळाला आहे. (Source: Time.com)
-
जगातील प्रसिद्ध मासिक टाइमने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांची ‘टाईम्स पर्सन ऑफ द इयर २०२१’ म्हणून निवड केली आहे. (फोटो: @TIME / Twitter )
-
एलन मस्क हे टेस्ला आणि स्पेसएक्स या कार कंपनीचे सीईओ आहेत. (Indian Express File Photo)
-
मॅगझिननुसार, एलन मस्क यांची निवड त्यांच्या अंतराळातील कामासाठी तसेच इलेक्ट्रिक कारसाठी करण्यात आली आहे. (फोटो: Reuters)
-
“एलन मस्क हे २०२१ मध्ये आपल्या समाजातील बदलाचे सर्वात मोठे उदाहरण आहेत.”असं टाइम मासिकाचे मुख्य संपादक एडवर्ड फेलसेन्थनल म्हणाले. (फोटो: Reuters)
-
टेस्लाचे बाजारमूल्य यावर्षी एक ट्रिलियन डॉलर्स (सुमारे ७६ लाख कोटी रुपये) पर्यंत वाढले आहे. (फोटो: AP)
-
कंपनीचे मूल्य आता फोर्ड मोटर आणि जनरल मोटर्सच्या एकत्रित मूल्यापेक्षा जास्त झाले आहे. (Photographer: Qilai Shen/Bloomberg)
-
टेस्ला दरवर्षी लाखो मोटारींचे उत्पादन करते आणि पुरवठा साखळीतही प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा चांगलं यश संपादन केलं आहे. (Source: Tesla)
-
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीकडे स्वतःचे एकही घर नाही. इलॉन मस्क सतत सांगत होते की, त्यांना त्यांच्या घरासह स्वतःच्या वस्तू विकायच्या आहेत. (Image source: Bloomberg)
-
बिझनेस इनसाइडरने एका अहवालात म्हटले आहे की एलोन मस्कची सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये ४७ एकरची मालमत्ता आहे. MLSListing.com च्या मते, २ डिसेंबर रोजी ते 30 दशलक्ष डॉलर्समध्ये विकले गेले आहे. (AP Photo/Susan Walsh, File)
-
घर विकल्यानंतर एलन मस्ककडे स्वतःचे घर राहिले नाही. सध्या एलन मस्क भाड्याने राहतात. (फोटो: Indian Express)
-
वास्तविक, एलन मस्क म्हणाले होते की २०२५० पर्यंत त्यांना मंगळावर १० लाख लोकांना पाठवायचे आहे. तेथे वसाहत उभारण्यासाठी त्यांना त्यांची सर्व मालमत्ता विकायची आहे. असा त्यांचा विश्वास आहे . (Indian Express File Photo)
-
मे महिन्यात एलन मस्कने सांगितले की त्याला आपली सर्व मालमत्ता विकून मंगळावर वसाहत उभारायची आहे. भविष्यात मला कोणतेही घर सोबत ठेवायचे नाही, असेही त्यांनी सांगितले होते. ( Reuters Photo)

Suryakumar Yadav: सूर्याचा घालीन लोटांगण शॉट! मिस्टर ३६० चा फटका पाहून वैभवने दिली भन्नाट रिॲक्शन, पाहा video