-
१४ फेब्रुवारी हा दिवस जगभरात ‘व्हॅलेंटाइन डे’ म्हणून साजरा करण्यात येतो. रोज डे पासून सुरु होणारा आठवडा व्हॅलेंटाइन डे दिवशी संपतो. जाणून घेऊया ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्तींबद्दल…
-
आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने अनेकांना मोहवणारी दिवंगत हिंदी चित्रपट अभिनेत्री मधुबाला. १४ फेब्रुवारी १९३३ रोजी जन्मलेली मधुबाला २३ फेब्रुवारी १९६९ रोजी वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी हे जग सोडून गेली.
-
मधुबालाचा अभिनय, तिचे सौंदर्य आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व या गुणांमुळे ती आजपर्यंतच्या हिंदी चित्रपटांतील अभिनेत्री नायिकांपैकी सर्वाधिक लोकप्रिय समजली जाते.
-
मधुबालाचे मूळचे नाव मुमताज बेगम जहाँ देहलवी.
-
भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९५२ रोजी झाला.
-
१९७७ साली वयाच्या २५ व्या वर्षी सुषमा स्वराज या कॅबिनेट मंत्री बनल्या होत्या. सर्वात कमी वयाच्या त्या कॅबिनेट मंत्री ठरल्या होत्या.
-
६ ऑगस्ट २०१९ रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं.
-
सुषमा स्वराज यांना एका राष्ट्रीय पक्षाच्या पहिल्या महिला प्रवक्त्या होण्याचाही मान मिळाला आहे. याव्यतिरिक्त राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री, केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि विरोधी पक्षाच्या पहिल्या महिला नेत्या होण्याचाही मान त्यांना मिळाला होता. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाची धुरा सांभाळणाऱ्या त्या दुसऱ्या महिला होत्या.
-
उर्दू शायर आणि गीतकार जान निसार अख्तर यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९१४ रोजी झाला होता.
-
इंडियन नॅशनल लोक दलाचे नेते अभयसिंह चौटाला यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९६३ रोजी झाला.
-
अभिनेता विशाल कोटियनचा जन्म १४ फेब्रुवारी १९८० रोजी झाला.
-
अभिनेत्री अभिनेत्री दीक्षा सेठचा जन्म १४ फेब्रुवारी १९८७ रोजी झाला.

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग