-
क्रिकेटर चहल आणि धनश्रीची जोडी सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय जोडीपैकी एक आहे. चहल आणि धनश्री २२ डिसेंबर २०२० ला लग्नबंधनात अडकले होते.
-
या दोघांनी आपल्या लग्नाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती.
-
धनश्री आणि चहल अनेकवेळा इन्स्टाग्रामवर डान्स रील्स करताना एकत्र दिसून येतात. तसंच धनश्री आईपीएल किंवा टीम इंडियाच्या मॅच दरम्यान स्टेडियम मध्ये उपस्थित असलेली दिसून आली आहे.
-
मात्र, सध्या चहल आणि पत्नी धनश्री यांच्यात काहीतरी बिनसलं असून ते घटस्फोट घेण्याच्या मार्गावर असल्याचे अंदाज लावले जात आहेत.
-
याचे कारण म्हणजे, इन्स्टाग्रामवर धनश्रीने नावात केलेला बदल आणि चहलने इन्स्टाग्रामवर डिलीट केलेली स्टोरी ठरत आहे.
-
धनश्रीने लग्नानंतर आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट मध्ये बदल करत चहल आडनाव जोडले होते मात्र तिने ते आडनाव काढून धनश्री वर्मा असा बदल केला आहे.
-
धनश्री नावात बदल केल्यानंतर चहलने सुद्धा आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली होती. त्यामध्ये ‘नवीन आयुष्याची सुरुवात’ असे लिहिले होते मात्र काही वेळानंतर ती डिलीट देखील केली होती. त्यामुळे चाहते विचारात पडले असून, दोघांनी घटस्फोट घेतल्याची चर्चा होत आहे.
-
दोघांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू असतानाच चहलने पत्नीसोबत घटस्फोट झालेल्या चर्चांना पूर्णविराम दिला असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका अशी विनंती केली आहे. तसेच धनश्रीने देखील हेच सांगत चर्चा थांबवण्याची विनंती केली आहे.
-
मात्र, या दोघांनी केलेल्या पोस्टमुळे या दोघांचा घटस्फोट होणार अशा चर्चा सध्या सोशल मीडियावर होताना दिसत आहेत.(all photo:instagram)

‘एक नंबर तुझी कंबर…’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही करतायत कौतुक