-
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगात एक असा देश आहे जिथे मृत्यूवर बंदी आहे. या देशात कोणी मरू शकत नाही. होय, तुमचा विश्वास बसणार नाही, पण या देशात लोकांच्या मृत्यूवर बंदी आहे हे अगदी खरं आहे.
-
नॉर्वेच्या स्वालबार्डमधील शहरात प्रशासनाने निसर्ग नियमाच्या विरोधात जाऊन मृत्यूला बंदी घातली आहे.
-
नॉर्वे आणि उत्तर ध्रुवादरम्यान असलेल्या या बेटावर गोठवणारी थंडी आहे. थंडीच्या मोसमात येथील तापमान इतके कमी होते की जगणे कठीण होते.
-
इथल्या लोकांना मरू दिले जात नाही. प्रशासनाने निर्बंध लादल्यानंतर गेल्या ७५ वर्षांपासून येथे एकही मृत्यू झालेला नाही.
-
खरं तर या बंदीचे कारण खूप मोठे आहे. प्रत्यक्षात येथे पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीमुळे वर्षानुवर्षे मृतदेह येथे पडून राहतात. थंडीमुळे ते मृतदेह सडत नाही.
-
वर्षानुवर्षे शरीर जसं आहे तसंच राहतं. या संशोधनात असे आढळून आले की 1917 मध्ये इन्फ्लूएंझामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या शरीरात इन्फ्लूएंझा विषाणू आढळून आला होता. त्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला होता. यानंतर प्रशासनाने या शहरात मृत्यू बंदी घातली.
-
एखाद्याला गंभीर आजार असल्यास त्याला ताबडतोब नॉर्वेला हलवले जाते कारण येथील रुग्णालय फार मोठे नाही. बेटावर कोणाचाही मृत्यू होऊ नये म्हणून हे करण्यात आले आहे. जर कोणी आजारी असेल तर त्याला उपचारासाठी नॉर्वेला पाठवण्यात येतं.
-
बाळाला जन्म देण्यासाठी रुग्णालयात लेबर वॉर्डही नाही.
-
अशा परिस्थितीत, एखाद्याचा मृत्यू होण्याची किंवा आणीबाणीची परिस्थिती येताच, त्या व्यक्तीला हेलिकॉप्टरने देशाच्या इतर भागात नेले जाते आणि मृत्यूनंतर तेथे त्याचे अंतिम संस्कार केले जातात. (All photos : Unsplash)

Air India Plane Crash Viral Video: विमान अपघाताचा व्हिडीओ रेकॉर्ड करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात; प्राथमिक चौकशी होणार