-
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष व राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेले शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे.
-
शरद पवार यांच्या यशस्वी कराकिर्दीत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांचा मोठा वाटा आहे.
-
१९६७ हे वर्ष शरद पवार यांच्यासाठी खऱ्या अर्थाने लाभदायक ठरलं. या वर्षातच आमदारकी आणि धर्मपत्नी त्यांच्या आयुष्यात आल्या.
-
बारामती विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांना तिकीट मिळालं आणि ते बहुमताने निवडूणही आले.
-
आमदारकी मिळाल्यानंतर त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांचं स्थळ त्यांच्यासाठी चालून आलं.
-
शरद पवारांचे मोठे बंधू माधवराव व अरविंद राणे यांची घट्ट मैत्री होती. इंग्लंडमध्ये ते एकत्र शिकत होते. या अरविंद राणेंना शरद पवार व त्यांची भावंडे ‘इंग्लिश मामा’ म्हणत असत.
-
भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केलेले सदाशिव शिंदे हे अरविंद राणे यांचे जावई होते. शिवाजी पार्कवर सराव करत असताना सदाशिव शिंदे यांचं उष्माघाताने निधन झालं होतं.
-
त्यामुळे त्यांची पत्नी आपल्या चार मुलींसह अरविंद राणे यांच्याकडे राहायल्या आल्या होत्या. त्यांच्याच चार मुलींपैकी एक कन्या म्हणजे प्रतिभा. (सगळ्यात उंच व उभ्या असलेल्या थोरल्या प्रतिभा पवार)
-
अरविंद राणे यांनी प्रतिभा यांच्यासाठी शरद पवारांचं स्थळ सुचवलं होतं. पण नुकतेच आमदार झालेले शरद पवार लग्न करण्यासाठी उत्सुक नव्हते.
-
त्यांच्या आई त्यांना स्थळ पाहण्यासाठी घेऊन गेल्या होत्या. मुलगी बघायला शरद पवार आईच्या आग्रहाखातर गेले खरे, पण तिथे जाऊन ते वर्तमानपत्र उघडून तोंडासमोर धरुन वाचत बसले होते.
-
त्यांनी प्रतिभा यांना पाहिलंसुद्धा नाही. पण होकार आला आणि त्यांचं लग्न ठरलं.
-
१ ऑगस्ट १९६७ रोजी शरद पवार व प्रतिभा पवार विवाहबद्ध झाले. बारमतीतच त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला.
-
परंतु, शरद पवार यांच्या लग्नासाठी मुहुर्त काढण्यात आला नव्हता. यशवंतराव चव्हाण व वसंतराव नाईक आल्यानंतर त्यांचं लग्न लावायचं असं ठरलं होतं.
-
त्यामुळेच लग्नाच्या दिवशीही दुपारी दोन वाजेपर्यंत शरद पवार कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत होते.
-
त्यावेळीच खंडाळा घाटात अपघात झाल्याने यशवंतराव चव्हाण व वसंतराव नाईक अडकून पडले होते. ते येईपर्यंत वेळ घालवायचा म्हणून एकापाठोपाठ एक मंगलाष्टकं सुरू झाली.
-
अखेर संध्याकाळी पाच वाजता यशवंतराव चव्हाण व वसंतराव नाईक लग्नमंडपात पोहोचले. त्यानंतर मग शरद पवार व प्रतिभा पवार यांचा विवाह पार पडला.
-
लग्न झाल्यानंतर प्रतिभा पवार शरद पवार यांना म्हणाल्या, “आणखी दहा मिनिटं उशीर झाला असता, तर मी तिथेच कोसळले असते”.
-
शरद पवार यांनी त्यांच्या ‘लोक माझा सांगाती’ या राजकीय आत्मचरित्रेत हा किस्सा सांगितला आहे.
-
शरद पवार पत्नी प्रतिभा पवार यांचा जुना फोटो.
-
(सर्व फोटो: इंडियन एक्सप्रेस,सुप्रिया सुळे/ इन्स्टाग्राम)

IPL 2025 Playoffs: क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटरचे संघ ठरले! कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार सामने? जाणून घ्या