-
Rahul Gandhi Networth: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा आज ५३ वा वाढदिवस आहे. १९ जून १९७० ला राहुल गांधी यांचा जन्म झाला होता. आज वाढदिवसाचे औचित्य साधून आपण राहुल गांधी यांच्या आजवरच्या आर्थिक कमाई व संपत्तीचा आढावा घेणार आहोत
-
निवडणुकांच्या वेळी आपण अनेकदा राहुल यांना लँड क्रूजर व बुलेट प्रूफ सफारी मध्ये प्रचार करताना पाहिले असेल पण मुळात त्यांच्या स्वतःच्या नावावर एकही गाडी नोंदवलेली नाही.
-
अमेठीचे माजी आमदार राहुल गांधी यांच्याकडे घर, गाडी नसली तरी कोट्यवधी रुपयांची जमीन, कार्यालये आहेत तसेच त्यांनी खूप गुंतवणूक केलेली आहे.
-
दिल्लीतील महरोली येथे राहुल गांधी यांच्या नावे एक शेत आहे, ज्याची किंमत साधारण १ कोटीच्या आसपास आहे. तसेच गुरुग्राम येथे त्यांच्या नावे एक ऑफिस सुद्धा आहे ज्याची किंमत ८.७५ कोटी पर्यंत आहे.
-
प्रतिज्ञापत्रानुसार राहुल गांधी यांच्याकडे कॅशमध्ये केवळ ४० हजार आहेत तर १७ लाख ९३ हजार रुपये विविध बँकांमध्ये आहेत. राहुल गांधी यांनी आपल्यावर ७२ लाख रुपयांचे कर्ज असल्याचे सुद्धा सांगितले आहे.
-
राहुल गांधी हे सलग तीन वेळा अमेठी मधून संसदेचे सदस्य बनले आहेत. २०१९ मध्ये मात्र त्यांना स्मृती इराणी यांच्यासमोर पराभव पत्करावा लागला होता.
-
देशातील एका जुन्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष असल्याने अनेकदा राहुल गांधी यांची गणना श्रीमंत राजकारण्यांमध्ये होते पण २०१९ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांची नेटवर्थ अवघी १५ कोटींची दाखवण्यात आली आहे.
-
अलीकडेच लोकसभा सदस्यत्व गमावलेले राहुल गांधी यांच्याकडून सरकारी बंगला काढून घेण्यात आला. त्यानंतर त्यांना आई, सोनिया गांधी यांच्या घरी राहावे लागले कारण रिपोर्टनुसार राहुल गांधी यांच्या नावे एकही घर नाही.
-
(सर्व फोटो: इंडियन एक्सप्रेस)

प्रसिद्ध अभिनेत्याने घटस्फोटानंतर ९ वर्षांनी केला साखरपुडा; अमृता खानविलकर कमेंट करत म्हणाली…