-
देशातील विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक मुंबईत आयोजित केली आहे.
-
३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर अशी दोन दिवस ही बैठक चालणार आहे. या बैठकीचं आयोजन महाविकास आघाडीतील पक्षांकडून केलं आहे.
-
या बैठकीची तयारी पूर्ण झाली असून ‘इंडिया’ आघाडीचे देशपातळीवरील नेते मुंबईत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. याबाबत मविआच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत कार्यक्रमाची माहिती दिली.
-
या पत्रकार परिषदेला शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, अशोक चव्हाण आणि संजय राऊत यांच्यासह इतरही नेते उपस्थित होते.
-
या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ‘इंडिया’ आघाडीकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल? याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.
-
दरम्यान, इंडिया आघाडीकडून उद्धव ठाकरेंना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करावा, अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्यांकडून केली जात आहे.
-
ठाकरे गटाच्या या मागणीवर स्वत: उद्धव ठाकरे यांनी मिश्किल वक्तव्य केलं आहे.
-
उद्धव ठाकरेंचं वक्तव्य ऐकून पत्रकार परिषदेच एकच हशा पिकला.
-
उद्धव ठाकरेंना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करावा, या ठाकरे गटाच्या मागणीबाबत एका पत्रकाराने प्रश्न विचारताच मिश्किल उत्तर देत उद्धव ठाकरे म्हणाले, “हो बरोबर आहे, मी उद्या जातो आणि पंतप्रधान पदाची शपथ घेतो.” (सर्व फोटो सौजन्य-यूट्यूब)

मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय भलामोठा अजगर; मुंबईकरांनो पावसाच्या पाण्यात चालताना सावधान! VIDEO पाहून घाम फुटेल