-
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी १२ जुलै ही तारीख ठरवण्यात आली आहे. जामनगर मधील पहिल्या भव्य दिव्या प्री वेडिंग सोहळ्यानंतर आता इटलीतील प्री वेडिंग भाग दोनची सुद्धा चर्चा रंगली आहे. २८ ते ३० मे दरम्यान हा दुसरा प्री वेडिंग सोहळा इटली व फ्रान्स दरम्यानच्या समुद्रातील भव्य क्रूझवर पार पडला. (@radhikamerchant_/Insta)
-
अंबानी कुटुंबाच्या या सोहळ्यात कॅटी पेरीपासून ते बॉलिवूडचे अभिनेते, गायक यांनीही हजेरी लावली होती. ज्या क्रूझवर हा भव्य कार्यक्रम पार पडला ती क्रूझ सुद्धा एखाद्या भव्य पंचतारांकित हॉटेलसारखी होती. अनेक सेलिब्रिटींनी क्रूझचे फोटो व व्हिडीओ सुद्धा शेअर केले आहेत. आज आपण सुद्धा अंबानींनी निवडलेल्या या क्रूझची खासियत व किंमत जाणून घेऊया
-
माल्टा येथे तयार झालेल्या या क्रूझचं नाव आहे ‘सेलिब्रिटी एसेंट’. २८ मे ला इटलीतील पालेर्मो पोर्ट येथून रवाना होऊन या क्रूझने तब्बल ४२८० किमी प्रवास करत दक्षिण फ्रान्स गाठलं होतं
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार या क्रूझवरील अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या प्री वेडिंग सोहळ्यासाठी तब्बल ८०० पाहुण्यांना आमंत्रण होतं, यातील ३०० जण VVIP होते
-
या पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी क्रूझवर ६०० जणांचा हॉस्पिटॅलिटी स्टाफ नेमण्यात आला होता. या क्रूझची मूळ क्षमता ३२७९ प्रवाशांना सामावू शकेल इतकी आहे
-
२०२३ मध्ये जेव्हा जी क्रूझ साकारण्यात आली तेव्हा बांधणीसाठीच साधारण ९०० मिलियन डॉलर्स म्हणजे ७४७५ हजार कोटींचा खर्च झाला होता
-
या क्रूझवर तब्बल १७ डेक, सनसेट बार, पूल डेक, रिसॉर्ट डेक, रिट्रीट,सारख्या अनेक लग्जरी सुविधा समाविष्ट आहेत
-
क्रूझवर एक पूल, २ हॉट टब इतकंच नव्हे तर चालण्यासाठी, जॉगिंगसाठी ट्रॅक सुद्धा बनवण्यात आला आहे
-
क्रूझच्या बेडरूममध्ये ड्रेसिंग रूम, लिव्हिंग एरिया, डायनिंग रूमचा समावेश आहे. (फोटो: @Celebrity Cruises/FB)

Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS