-
देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. १२ जुलै २०२४ रोजी एका भव्य विवाह सोहळ्यात अनंत आणि राधिका लग्नबंधनात अडकले. यावेळी बॉलीवूडमधील बडे स्टार्स तसेच अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी लग्नाला उपस्थिती लावलीच शिवाय त्यांनी नवविवाहित जोडप्याला महागड्या भेटवस्तू देऊन शुभेच्छाही दिल्या. अनंत आणि राधिकाला त्यांच्या लग्नात कोणी काय गिफ्ट दिलं ते जाणून घेऊया. (फोटो: @ambani_update/instagram)
-
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, ॲमेझॉनचे माजी अध्यक्ष आणि सीईओ जेफ बेझोस यांनी अनंत आणि राधिकाला ११.५० कोटी रुपयांची बुगाटी कार भेट दिली आहे. (फोटो: @jeffbezos/instagram)
-
अमेरिकन अभिनेता आणि व्यावसायिक कुस्तीपटू जॉन सीनाने अनंत आणि राधिकाला ३ कोटी रुपयांची लॅम्बोर्गिनी कार भेट दिली आहे. (पीटीआय फोटो)
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी अनंत आणि राधिकाला ३०० कोटी रुपयांचे खासगी जेट पाठवले आहे. (फोटो: @zuck/instagram)
-
बिल गेट्स यांनी नवविवाहित जोडप्याला ९ कोटी रुपयांची हिऱ्याची अंगठी दिली आहे. मात्र, बिल गेट्सने या जोडप्याला १८० कोटी रुपयांची आलिशान नौकाही भेट दिल्याचा दावा केला जात आहे. (फोटो: @thisisbillgates/instagram)
-
सुंदर पिचाई यांनी त्यांना १०० कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर भेट दिले आहे. (फोटो: @sundarpichai/instagram)
-
इवांका ट्रम्प यांनी अमेरिकेत नवविवाहित जोडप्याला ८० कोटी रुपयांचे आलिशान घर दिले आहे. (फोटो: @ivankatrump/instagram)
-
बॉलीवूडलाइफच्या वृत्तानुसार, कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांना त्यांच्या लग्नात १९ लाख रुपयांची सोन्याची चेन भेट दिली आहे. (पीटीआय फोटो)
-
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी २५ लाख रुपयांची हस्तनिर्मित शाल भेट दिली आहे. (पीटीआय फोटो)
-
अक्षय कुमारने ६० लाख रुपये किमतीचा सोन्याचा पेन भेट म्हणून दिला आहे. (फोटो: @akshaykumar/instagram)
-
शाहरुख खानने फ्रान्समध्ये ४० कोटी रुपयांचे आलिशान अपार्टमेंट गिफ्ट केले आहे. (पीटीआय फोटो)
-
बच्चन कुटुंबाने ३० कोटी रुपयांचा हिरा आणि पन्ना नेकपीस भेट दिला आहे. (पीटीआय फोटो)
-
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने या जोडप्याला ९ कोटी रुपयांची ‘मर्सिडीज’ कार दिली आहे. (पीटीआय फोटो)
-
सलमान खानने १५ कोटी रुपयांची स्पोर्ट्स बाईक भेट दिली आहे. (पीटीआय फोटो)
-
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी 20 कोटी रुपयांची कस्टमाइज्ड ‘रोल्स रॉयस’ कार भेट दिली आहे. (फोटो: @ranveersingh/instagram)
(येथे देण्यात आलेली माहिती मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आहे.)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल