-
भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आणि अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी अॅक्सिओम-४ मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी उड्डाण घेतले. तेव्हा केवळ भारतच नाही तर त्यांच्या कुटुंबाचाही उर अभिमानाने भरून आला. (Photo Source: axiomspace.com)
-
या ऐतिहासिक कामगिरीमागे त्यांची पत्नी डॉ. कामना मिश्रा यांचा सर्वात मोठा वाटा असल्याचे शुक्ला सांगतात. डॉ. कामना या केवळ त्यांच्या पत्नी नसून प्रेरणास्त्रोतही आहेत, असे शुभांशू शुक्ला सांगतात. (Photo Source: @gagan.shux/instagram)
-
बालपणीची मैत्री, प्रेम आणि लग्न
लखनऊचे रहिवासी शुभांशू शुक्ला आणि कामना मिश्रा यांची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही. दोघेही शाळेत एकमेकांना भेटले आणि तेव्हापासून ते एकमेकांचे चांगले मित्र बनले. कालांतराने मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि नंतर कुटुंबाच्या संमतीने दोघांनीही लग्न केले. (Photo Source:@gagan.shux/instagram) -
या जोडप्याला ६ वर्षांचा एक मुलगा आहे. डॉ. कामना यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, “आम्ही इयत्ता तिसरीपासून एकत्र शिकलो आहोत. शुभांशू स्वभावाने खूप लाजाळू आणि शांत होता, पण आज तो लाखो लोकांसाठी प्रेरणास्त्रोत बनला आहे.” तसेच शुभांशू यांचे अवकाशाशी सर्वात आधी नाते जडले, असेही त्या म्हणाल्या. (Photo Source:@gagan.shux/instagram)
-
डॉ. कामना मिश्रा कोण आहेत?
डॉ. कामना मिश्रा या व्यवसायाने दंतचिकित्सक आहेत. त्यांनी त्यांची कारकिर्द सांभाळत असताना शुभांशू यांचे दीर्घ आणि कठीण प्रशिक्षण सुरू असताना कुटुंबाचीही काळजी घेतली. (Photo Source:@gagan.shux/instagram) -
अंतराळवीर यासारख्या कठीण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीबरोबर संसार करणे तसे कठीण काम आहे. पण कामना यांनी प्रत्येक आव्हानाला ताकदीने आणि संयमाने तोंड दिले. (Photo Source:@gagan.shux/instagram)
-
निरोपाचा भावनिक संदेश
अंतराळात जाण्यापूर्वी, शुभांशू यांनी इन्स्टाग्रामवर पत्नीसाठी एक भावनिक आणि हृदयस्पर्शी संदेश लिहिला. तो असा, “कामना, तुझे विशेष धन्यवाद. तुझ्याशिवाय हे शक्य झाले नसते, परंतु त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे तुझ्याशिवाय हे महत्त्वाचेही नसते.” (Photo Source:@gagan.shux/instagram) -
याबरोबर त्यांनी एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ते आणि डॉ. कामना उभे असून त्यांच्यात काचेची भिंत आहे. डॉ. कामना यांनी शुंभाशू यांना निरोपाच्या शुभेच्छा दिल्या. (Photo Source:@gagan.shux/instagram)
-
एएनआयशी बोलताना शुभांशू यांची आई आशा शुक्ला म्हणाल्या, “हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. हे सर्व आमच्या सुनेमुळे शक्य झाले. तिने प्रत्येक पावलावर शुभांशूला साथ दिली आणि त्याला मानसिक बळ दिले.” (Photo Source:@gagan.shux/instagram)
-
शुभांशू यांचे वडील शंभूनाथ शुक्ला, जे निवृत्त सरकारी अधिकारी आहेत. त्यांनी त्यांच्या मुलाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. आपला मुलगा या मोहिमेत यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Photo Source: @gagan.shux/instagram)
-
अॅक्सिओम-४ मिशन आणि शुभांशू यांचे योगदान
२५ जून २०२५ रोजी शुभांशू शुक्ला यांनी अॅक्सिओम-४ मोहिमेअंतर्गत स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगन कॅप्सूलमधून उड्डाण केले. हे अभियान भारतासाठी ऐतिहासिक आहे, कारण ४१ वर्षांनंतर एक भारतीय नागरिक अंतराळात गेला आहे. (Photo Source: axiomspace.com)

भर बसस्थानकात तरुणाचं घाणेरडं कृत्य! महिलांसमोर जाऊन बसला अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अशांना चोपलंच पाहिजे”