-
Shivaji Maharaj Forts In UNESCO World Heritage: छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. (Photo: ChatGPT)
-
जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट झालेल्या या यादीत महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी हे ११ किल्ले आणि तमिळनाडूतील जिंजी या एका किल्ल्याचा समावेश आहे. (Photo: ChatGPT)
-
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ मानांकनासाठी आवश्यक असलेल्या ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ या निकषांवर या १२ किल्ल्यांची निवड झाली. यानिमित्ताने जाणून घेऊयात युनेस्को काय आहे? आणि ते कसे काम करते? (Photo: ChatGPT)
-
युनेस्को काय आहे?
युनेस्को (युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अॅण्ड कल्चरल ऑर्गनायझेशन (UNESCO) ही संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना आहे. संयुक्त राष्ट्रांनी मिळून निर्माण केलेली ही एक विशेष संस्था आहे. (Photo: MetaAI) -
संस्थेचे धेय्य काय?
या संस्थेमार्फत शिक्षण, विज्ञान, संस्कृती आणि संप्रेषणाद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन देणे आहे. सहकार्यातून शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित करणे, न्याय, कायद्याचे राज्य, मानवी हक्क आणि मूलभूत स्वातंत्र्यांवर जागतिक एकमत निर्माण करणे हे युनेस्कोचे मुख्य ध्येय आहे. (Photo: MetaAI) -
थोडक्यात ही संघटना जागतिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाच्या संरक्षणाशी संबंधित स्थळांचे संरक्षण आणि जतन करण्याचा प्रयत्न करते. हा आंतरराष्ट्रीय करार १९७२ मध्ये तयार करण्यात आला होता. (Photo: MetaAI)
-
ज्या देशांनी कराराला मान्यता दिली आहे, ते त्यांच्या देशातील ठिकाणे जागतिक वारसा समितीला नामनिर्देशित करतात. (Photo: MetaAI)
-
जागतिक वारसा स्थळामध्ये एखाद्या ठिकाणाचा समावेश केला जातो, त्यावेळी काही निकषांची पूर्तता करणे आवश्यक असते. त्या ठिकाणाला वैश्विक मूल्य असणे ही प्रमुख अट मानली जाते. (Photo: MetaAI)
-
युनेस्कोचे मुख्यालय पॅरिस, फ्रान्स येथे आहे आणि आतापर्यंत या संस्थेत १९४ सदस्य देश आणि १२ सहयोगी सदस्य आहेत. (Photo: MetaAI)
-
(Photo: MetaAI) हेही पाहा- अमेरिकेतल्या टॉप कंपन्यांसाठी भारतातून काम करा; घरी बसून कमवा लाखो, ‘या’ ५ प्लॅटफॉर्मवर मिळतील नोकऱ्या…

Russian Woman : घनदाट जंगलातील गुहेत आढळून आली रशियन महिला, दोन मुलींसह करत होती वास्तव्य; सांगितलं ‘हे’ कारण