-
टेक जायंट अॅमेझॉनने अमेरिकेत काम करणाऱ्या परदेशी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठा खुलासा केला आहे. बिझनेस इनसाइडरच्या अहवालानुसार, २०२५ च्या पहिल्या तिमाहीत अॅमेझॉनने एच-१बी व्हिसाखाली अमेरिकेत ११,३०० परदेशी कामगारांना कामावर ठेवले. हे कर्मचारी प्रामुख्याने तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर आणि डेटा सायन्ससारख्या क्षेत्रात काम करतात. उघड झालेल्या पगाराच्या आकडेवारीवरून अॅमेझॉन आपल्या कर्मचाऱ्यांना किती पगार देते हे दिसून येते. (Photo: Meta AI)
-
२ लाख डॉलर्सपेक्षा जास्त पगार
Amazon.com आणि त्याच्या सहाय्यक कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर, डेटा सायंटिस्ट आणि प्रॉडक्ट मॅनेजर यासारख्या पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना २ लाख डॉलर्सपेक्षा जास्त पगार मिळतो. यापैकी बहुतेक कर्मचारी भारतीय आहेत, जे H-1B व्हिसाखाली अमेरिकेत काम करत आहेत. (Photo: Meta AI) -
२२३,६०० डॉलर्स
Amazon Web Services (AWS) मध्ये, सॉफ्टवेअर इंजिनिअरला ८४,००० ते २२३,६०० डॉलर्सपर्यंत पगार मिळतो. त्याच वेळी, एंटरप्राइझ अकाउंट इंजिनिअरचा पगार २३८,९६५ डॉलर्सपर्यंत जातो. Amazon.com मध्ये अप्लाइड सायंटिस्टला २६०,००० पर्यंत पगार दिला जातो. (Photo: Meta AI) -
सॉफ्टवेअर इंजिनिअर पगार
अमेझॉन डेटा सर्व्हिसेसमध्येही, सॉफ्टवेअर अभियंत्यांना १०८,८२६ ते २२३,६०० डॉलर्स दरम्यान पगार मिळतो. तर अमेझॉन डेव्हलपमेंट सेंटरमध्ये त्याच पदावर काम करणाऱ्यांना ९५,४९३ ते २६०,६०० डॉलर्स पर्यंत पगार मिळतो. (Photo: Meta AI) -
डेटा सायंटिस्टचा पगार
Amazon.com सर्व्हिसेसमध्ये मॅनेजर (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट) चा पगार १४८,९५० डॉलर्स पासून ते २८७,७०० पर्यंत जातो. तर टेक्निकल प्रोडक्ट मॅनेजरला २३५,२०० आणि डेटा सायंटिस्टला २३०,९०० डॉलर्स पर्यंत पगार मिळतो. (Photo: Meta AI) -
प्रोग्राम मॅनेजर पगार
ऑएका बिझनेस अॅनालिस्टला ७९,५१८ ते १४३,१०० आणि क्वालिटी अॅश्युरन्स इंजिनिअरला ८६,३२० ते १८५,००० डॉलर्स पर्यंत पगार मिळतो. याशिवाय, सप्लाय चेन मॅनेजर, प्रोग्राम मॅनेजर सारख्या पदांचे पगारही खूप चांगले आहेत. (Photo: Meta AI) -
कपात
दरम्यान, Amazon ने त्यांच्या क्लाउड डिव्हिजन AWS मधील शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ‘स्पेशलिस्टना (ग्रुप) सर्वाधिक फटका बसला आहे. कंपनीने जनरेटिव्ह एआय टूल्सचा वाढता वापर हे यामागचे कारण असल्याचे म्हटले आहे. (Photo: Meta AI) -
वेतनामागिल भूमिका
अमेझॉनच्या प्रवक्त्याने सांगितले की, कंपनी बाजारपेठेतील सर्वोत्तम प्रतिभा टिकवून ठेवण्यासाठी वेळोवेळी त्यांच्या वेतन रचनेचा आढावा घेते. कर्मचाऱ्यांचे वेतन भूमिका, अनुभव आणि कामगिरीवर अवलंबून असते. (Photo: Meta AI) -
मार्च २०२५ पर्यंत, Amazon चे जगभरात एकूण १.६ दशलक्ष पूर्णवेळ (फुल टाईम) आणि अर्धवेळ (पार्ट टाईम) कर्मचारी आहेत, ज्यात मोठ्या संख्येने भारतीय तंत्रज्ञान तज्ञांचा (टेक एक्सपर्ट) समावेश आहे. (Photo: Meta AI) हेही पाहा- मुकेश अंबानींच्या ‘या’ १५ कंपन्या आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप किती माहितीये का?

अजित पवारांसारखी कठोरता एकनाथ शिंदे दाखवतील? शरद पवार गटाचा सवाल; माणिकराव कोकाटेंचा उल्लेख करत म्हणाले…