-
पावसाळी अधिवेशनामध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Photo: PTI)
-
यावेळी त्यांनी काँग्रेस सरकारने पाकिस्तानला किती जमीन परत केली हे देखील नमूद केले. (Photo: PTI)
-
पहलगाम हल्ल्यावर भाष्य करताना अमित शहा यांनी विरोधकांवर निशाणा साधला आणि म्हटले की, “जर १९७१ च्या युद्धात इंदिरा गांधी सरकारने पाकिस्तानला जमीन परत केली नसती तर आज हे दहशतवादी हल्ले झाले नसते.” (Photo: PTI)
-
दरम्यान, १९७१ च्या युद्धात भारताने पाकिस्तानची किती किलोमीटर जमीन ताब्यात घेतली होती त्याबद्दल चला जाणून घेऊयात.(Photo: Indian Express)
-
१९७१ च्या युद्धात भारताकडून पाकिस्तानचा दारूण पराभव झाला. या युद्धात पाकिस्तानने शरणागती पत्करली आणि त्यांचे ९३ हजारांहून अधिक युद्धकैदी भारताच्या ताब्यात होते. (Photo: Indian Express)
-
या युद्धात भारताने ५,७९५ चौरस मैल (सुमारे १५,००० चौरस किलोमीटर) पाकिस्तानी जमीन ताब्यात घेतली. (Photo: Indian Express)
-
पण नंतर भारताने संपूर्ण जमीनच पाकिस्तानला परत केली नाही तर मानवतेच्या विचाराने शिमला करारावर स्वाक्षरी केली आणि सर्व युद्धकैद्यांची सुटकाही केली. (Photo: Indian Express)
-
तर पाकिस्तानकडे भारताची सुमारे ७८,००० चौरस किलोमीटर जमीन आहे ज्यामध्ये गिलगिट-बाल्टिस्तान आणि पीओके (पाक व्याप्त काश्मीर) समाविष्ट आहे. (Photo: Indian Express)
-
१९७१ च्या युद्धात भारतीय सैन्याने पूर्व पाकिस्तानातील ढाका आणि पश्चिम पाकिस्तानातील लाहोर ताब्यात घेतले होते. त्यावेळी पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैन्यासमोर गुडघे टेकून शरणागती पत्करली होती. (Photo: Indian Express) हेही पाहा – आता UPI व्यवहारांवर लागणार शुल्क? आरबीआय गव्हर्नरांनी दिले संकेत; १ ऑगस्टपासून दोन महत्वाचे बदल…

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत